शुक्रवार, सप्टेंबर 11, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शिव ठाकरेच्या लग्नाबाबत चर्चांना पूर्णविराम? अभिनेता प्रतिक्रिया देत म्हणाला, “याच वर्षी लग्न करणार पण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 17, 2026 | 6:04 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shiv Thakrey Reaction Wedding News

शिव ठाकरेच्या लग्नाबाबत चर्चांना पूर्णविराम

Shiv Thakrey Reaction Wedding News: ‘बिग बॉस’मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता शिव ठाकरे सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण यावेळी त्याच्या कामामुळे नव्हे, तर वैयक्तिक आयुष्यामुळे. काही दिवसांपूर्वी शिवने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका फोटोमुळे त्याच्या लग्नाबाबत जोरदार चर्चा रंगल्या होत्या. अखेर या चर्चांवर स्वतः शिव ठाकरेने प्रतिक्रिया देत सर्व संभ्रम दूर केला आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेला शिव ठाकरे आपल्या दैनंदिन आयुष्यातील घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

काही दिवसांपूर्वी त्याने एक फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये तो नवरदेवाच्या लूकमध्ये दिसत होता. त्या फोटोमध्ये त्याच्यासोबत एक तरुणीही होती आणि दोघांचे लग्न होत असल्याचा आभास निर्माण झाला होता. विशेष म्हणजे, या फोटोला शिवने “फायनली” असं कॅप्शन दिल्यामुळे चाहत्यांना त्याचं खरंच लग्न ठरलं असल्याचं वाटू लागलं. मात्र, काही वेळातच शिवने तोच फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत “नवीन वर्षातील पहिलं शूट” असं लिहिलं आणि हे लग्न नसून फक्त शूटिंग असल्याचं स्पष्ट केलं. तरीही चर्चांना पूर्णविराम लागला नव्हता. (Shiv Thakrey Reaction Wedding News)

आणखी वाचा – ‘पारू’ फेम अभिनेत्रीने खरेदी केली नवी कार; ‘तो’ व्हिडीओ शेअर करत म्हणाली,“माझी नवीन कार…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अशातच माध्यमांशी संवाद साधताना शिव ठाकरेने लग्नाबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. तो म्हणाला की, “मी याच वर्षी लग्न करणार आहे. सध्या मुलगी शोधण्याचं काम सुरू आहे.” एका व्हायरल व्हिडीओमध्ये त्याला ‘वहिनी कुठे आहे?’ असं विचारलं असता, तो हसत म्हणाला, “कोणती वहिनी? ते मॅनिफेस्ट होतं, शूटिंग होतं.” पुढे तो म्हणाला, “तुम्ही लोकांनी त्या फोटोला एवढं प्रेम दिलं की आता खरंच लग्न करावं लागेल.” लग्न कधी करणार, या प्रश्नावर तो ठामपणे म्हणाला, “याच वर्षी करणार. देव जिथे ठरवेल तिच्याशीच लग्न होईल. शोध सुरू आहे आणि बायोडेटाही तयार आहे” लग्नाची जबाबदारी कोण ठरवणार, यावर शिवने सांगितलं की, “हो, आईच ठरवणार.” शिव ठाकरेच्या या वक्तव्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे, आता खऱ्या आयुष्यातील ‘वहिनी’ कधी समोर येणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Shiv Thakrey Reaction Wedding News)

आणखी वाचा – भाऊच्या धक्क्यावर तन्वीनंतर रितेश देशमुखने रुचिताला चांगलंच झापलं; म्हणाला, “स्वतःलाच पंजे मारणारी वाघीण”

Tags: marathi actormarathi entertainment newsShiv Thakrey Reaction Wedding News
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Bigg Boss Marathi 6 update

'बिग बॉस' मराठी 6 मध्ये रितेश देशमुखने केलं प्रभू शेळकेचं भरभरून कौतुक; म्हणाला, "Entertainment चा Don..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.