शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बिग बॉस’ मराठी 6 मध्ये रितेश देशमुखने केलं प्रभू शेळकेचं भरभरून कौतुक; म्हणाला, “Entertainment चा Don…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 17, 2026 | 6:26 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 6 update

रितेश देशमुखने केलं प्रभू शेळकेचं भरभरून कौतुक

Bigg Boss Marathi 6 update: ‘बिग बॉस’ मराठीच्या सहाव्या पर्वाने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पहिल्याच आठवड्यात घरातील वातावरण तापलेलं असतानाच, भाऊंचा धक्का हा प्रेक्षकांसाठी विशेष मनोरंजक ठरत असल्याचं दिसून येत आहे. या टास्कदरम्यान होस्ट रितेश देशमुख काही स्पर्धकांची चांगलीच शाळा घेताना दिसत आहेत, तर काही सदस्यांच्या खेळाचं कौतुकही करताना पाहायला मिळत आहे. या सिझनच्या पहिल्याच भाऊंच्या धक्क्यावर ‘काळू डॉन’ म्हणून ओळखला जाणारा प्रभू शेळके सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

आणखी वाचा: शिव ठाकरेच्या लग्नाबाबत चर्चांना पूर्णविराम? अभिनेता प्रतिक्रिया देत म्हणाला, “याच वर्षी लग्न करणार पण…”

रितेश देशमुख यांनी प्रभू शेळकेचं भरभरून कौतुक केल्याचं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. रितेश प्रभूला गमतीशीर अंदाजात म्हणतात, “तुम्ही प्रेक्षकांना गोट्यांचे नवनवीन प्रकार शिकवले,” यावर घरातील सर्व सदस्य हसताना दिसतात आणि घरात हलकाफुलका माहोल निर्माण होतो. पुढे रितेश देशमुख प्रभूला म्हणतात की, बाहेरच्या दुनियेत तुम्ही एका कॅमेऱ्यातून कंटेंट तयार करत होतात, मात्र इथे तब्बल शंभर कॅमेरे आहेत. तरीही तुम्ही सर्वांना हसवलंत, रडवलंत आणि एंटरटेन केलंत. (Bigg Boss Marathi 6 update)

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

रितेश पुढे असंही सांगतात की, “इतर तुम्हाला लहान समजत आहेत, पण या आठवड्याचे खरे एंटरटेनमेंटचे डॉन तुम्हीच आहात.” रितेश देशमुख यांच्या या वक्तव्यामुळे प्रभू शेळके भावुक झाल्याचंही पाहायला मिळत आहे. घरातील सदस्यांसमोर मिळालेल्या या कौतुकानंतर प्रभूचा आत्मविश्वास आणखी वाढलेला दिसत असून, प्रेक्षकांमध्येही त्याच्या खेळाबाबत सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे. प्रभू शेळकेला मिळालेलं हे कौतुक त्याच्यासाठी नक्कीच मोठं ठरणार आहे. आता येत्या आठवड्यांमध्ये प्रभू हा ‘एंटरटेनमेंटचा डॉन’ हा टॅग कसा जपतो, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. (Bigg Boss Marathi 6 update)

आणखी वाचा: रणबीर कपूरसोबत झळकली ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री, अनुभव शेअर करत म्हणाली, “खऱ्या आयुष्यात अत्यंत नम्र…”

Tags: bigg boss marathiBigg Boss Marathi 6 Updateprabhu shelkeriteish deshmukh
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
bigg boss marathi 6

'बिग बॉस मराठी ६'मधून राकेश बापट घराबाहेर, अनुश्रीचे शब्द खटकले, तोडफोड केली आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.