गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिव ठाकरेने सुरु केला नवा बिझनेस; ‘या’ शहरात केलं सलोनचं उद्घाटन; व्हिडीओ समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 20, 2026 | 1:28 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shiv Thakrey New Salon Open

शिव ठाकरेने सुरू केला नवा बिझनेस

Shiv Thakrey New Salon Open : मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय चेहरा शिव ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याने आता आपल्या करिअरमध्ये एक नवीन वळण घेतलं आहे. अभिनय आणि रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांची मनं जिंकलेल्या शिवने यावेळी व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकत चाहत्यांना एक खास सरप्राइज दिलं आहे. गुढीपाडव्याच्या शुभदिनी त्याने आपल्या स्वप्नातील व्यवसायाची सुरुवात केली. अमरावतीमध्ये त्याने स्वतःचं आकर्षक सलून सुरु केलं आहे.

शिवने सुरु केलेल्या नव्या सलूनचं नाव “Amraa Studio Salons” असं ठेवण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून या सलूनच्या तयारीचे व्हिडीओ आणि अपडेट्स तो सोशल मीडियावर शेअर करत होता. ज्याने चाहत्यांमध्ये देखील खूप उत्सुकता होती. अखेर शिवचं स्वप्न पूर्ण झालं आहे आणि शुभ मुहूर्त साधत त्याने त्याच्या सलूनचं उद्घाटन केलं. या नव्या प्रवासाबद्दल बोलताना शिवने आपले भावनिक विचारही व्यक्त केले. त्याने सांगितलं की, या सलूनला त्याने अत्यंत प्रेमाने आणि जिव्हाळ्याने उभं केलं आहे. त्याच्या मित्रांनी आणि संपूर्ण टीमने दिलेलं सहकार्य त्याच्यासाठी अमूल्य ठरलं.

आणखी वाचा – मराठमोळ्या अभिनेत्याने सुरु केला नवा व्यवसाय, पारंपरिक व्यवसायाने जिंकली मन, कलाकारांनीही केलं कौतुक

View this post on Instagram

A post shared by Amraa Studio Salons (@amraastudiosalons)

पैशांपलीकडे जाऊन त्यांनी हा प्रोजेक्ट स्वतःचा मानून काम केल्याचंही त्याने नमूद केलं. विशेष म्हणजे, आजीच्या आशीर्वादाने ही नवी सुरुवात होत असल्याने त्याच्यासाठी हा क्षण अधिकच खास ठरला. शिवच्या या नव्या उपक्रमाला मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर चाहत्यांकडूनही त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. एकंदरीत, छोट्या पडद्यावर आपली ओळख निर्माण केल्यानंतर आता व्यवसायातही स्वतःची छाप पाडण्यासाठी शिव ठाकरे सज्ज झाला आहे. शिवने शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओवर अनेक कलाकार आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला.

आणखी वाचा – मनीष मल्होत्राच्या आईचे निधन, वयाच्या ९४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सांत्वनास ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चनसह अनेक कलाकार पोहोचले

Tags: marathi actormarathi entertainment newsShiv Thakrey New Salon Open
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
kaylee hottle died
Entertainment

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

जुलै 22, 2026 | 11:00 am
Next Post
Kapil Honrao On Riteish Deshmukh

रितेश देशमुखने 'या' अभिनेत्याला दिलं गोड सरप्राईज, गुढीपाडव्यादिवशी थेट कॉल केला आणि…; म्हणाला…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.