अभिनेत्री जान्हवी कपूर ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तसेच तिच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अफेअर्सच्या चर्चांमुळे चर्चेत आहे. गेले बरेच वर्ष जान्हवीचं नाव शिखर पहाडिया याच्याबरोबर जोडलं जात आहे. त्यांच्या अफेअर्सच्या बातम्यां सगळीकडेच जोर धरताना दिसत आहे. शिखर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. जान्हवी व शिखरला अनेकदा एकत्र स्पॉट केलं गेलं आहे. काही दिवसांपूर्वी खुशी कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीतही हे दोघे एकत्र दिसले होते. त्यामुळे त्यांच्या अफेअर्सच्या चर्चांना आणखीनच उधाण आलं आहे. आताही एका पोस्टवर शिखर पहाडिया याने केलेल्या कमेंटमुळे त्यांच्या नात्यावर शिक्का मोर्तब केलं जात आहे. (Shikhar approves his relationship janhvi)
एका आठवड्यापूर्वी ओरहान अवत्रामणी याच्या इन्स्टाग्राम हँडलवर पार्टीचा व्हिडीओ समोर आला होता. यात सुहाना खान, खुशी कपूर, सारा अली खान, राशा थडानी, अलाया एफ व निर्वाण खान यांसारख्या स्टार किड्सनी हजेरी लावली होती. या पार्टीत शिखर पहाडिया व त्याचा भाऊ वीर पहाडिया देखील उपस्थित होती. मात्र जान्हवी या पार्टीत उपस्थित नव्हती.

या व्हिडीओमध्ये शिखर एका मुलीबरोबर पोज देताना दिसला. या व्हिडीओवर कमेंट करत जान्हवीने शिखरला टॅग करत गुलाबी ड्रेसमधील मुलगी कोण? असा प्रश्न विचारला होता. या कमेंटनंतर शिखरने तिला टॅग करत लिहिलं, “मी सर्वस्वी तुझा आहे… आणि मी फक्त तुझा आहे…” शिखरच्या या कमेंटमुळे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची पुष्टी होत आहे. मात्र त्यानंतर काही काळातच जान्हवी व शिखरने त्यांचे ते सर्व कमेंट डिलीट केले.

जान्हवी व शिखर एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतात. मैत्रीच्या काही काळानंतर त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केलं. शिखर व जान्हवीच्या नात्याबाबतही लोकांना तेव्हा कळलं जेव्हा कॉफी विथ करणच्या एक भागात करण जौहरने याबाबत खुलासा केला होता. दरम्यानच्या काळात दोघांचं ब्रेकअप झाल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. मात्र त्यानंतर दोघं बऱ्याचदा एकत्र दिसले होते.