रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मुंबईत राहून अजून मराठी येत नाही?”, मराठमोळ्या अभिनेत्रीने कपिल शर्माला धारेवर धरलं आणि…; जुना व्हिडीओ समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 7, 2025 | 3:45 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi Actress Scold Kapil Sharma

"मुंबईत राहून अजून मराठी येत नाही?", मराठमोळ्या अभिनेत्रीने कपिल शर्माला धारेवर धरलं आणि…; जुना व्हिडीओ समोर

Marathi Actress Scold Kapil Sharma : सध्या महाराष्ट्रात मराठी-हिंदी हा वाद पेटून उठलेला पाहायला मिळाला. प्रत्येक दिवशी या प्रकरणासंबंधित वाद कोणत्या ना कोणत्या ठिकाणाहून ऐकू येतो. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्र लागू केले आणि अभ्यासक्रमात हिंदी भाषा सक्तीची केली त्यावेळी सरकारविरोधात संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळाली. केवळ सर्वसामान्यच नव्हे तर सेलिब्रिटी मंडळीही या निर्णयाचा निषेध करताना दिसले. अनेक कलाकारांनी त्यांच्या सोशल मिडीया अकाउंटवर यासंदर्भात पोस्ट शेअर करत याबाबतचा राग व्यक्त केला. दरम्यान, सरकारने हा निर्णय मागे गेतल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी घडामोड झाल्याचं पाहायला मिळालं.

गेल्या वीस वर्षात जे शक्य झालं नाही ते या मराठी भाषेने करुन दाखवलं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बांधवांनी एकत्र येत मराठी भाषेच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याचं ठरवलं. एकाच मंचावर येत या दोघांनी हात मिळवणी केली आणि हे पाहून अनेकांचे डोळेही पाणावले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याने बऱ्याच नागरिकांच्या डोळ्यात चमक पाहायला मिळाली. हा मराठी भाषेचा वाद सुरु असताना एका शोमधील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कपिल शर्मा शोमधील आहे.

आणखी वाचा – फराह खानच्या किचनमध्ये वाढलेलं झुरळांचं वास्तव्य, ‘या’ एका युक्तीने सोडवला प्रश्न, व्हिडीओद्वारे दाखविली झलक

तुला मुंबईत राहून मराठी येत नाही ?#मराठी pic.twitter.com/fSoz4sNv4Z

— बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ (@RetweetMarathi) July 6, 2025

अभिनेता आणि विनोदी कलाकार कपिल शर्मा यांचा एक जुना व्हिडीओ समोर आला आहे. कपिल शर्मा शोमधील या व्हिडीओमध्ये एक मराठी अभिनेत्री कपिल शर्माची मराठी न येण्यावरुन शाळा घेताना दिसत आहे. ही अभिनेत्री म्हणजे शिबानी दांडेकर. शिबानीने कपिलला म्हटले की, ‘तू इथे मला का बोलावलं आहेस?’. मग ती म्हणते की मला मराठी येत तुला येतं का मराठी? यावर कपिल निरुत्तर होतो.

आणखी वाचा – करीना कपूरचा PRADA ला टोमणा, कोल्हापुरी चप्पल पायात घालत फोटोही केला शेअर, म्हणाली…

मग शिवानी सांगते, ‘मला इंग्लिश बोलता येतं, मराठी येतं… पण तू हिंदीत बोलतो! आता काय करायचं… ? मुंबईमध्ये राहून तुला अजून मराठी येत नाही?’. शिबानीच्या या विधानामुळे तिथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांमध्ये हास्य पाहायला मिळतंय. पण कपिलचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झालेला असतो. हा व्हिडीओ खूप जुना आहे पण सध्या मराठी हिंदी भाषा वादात तो पुन्हा एकदा व्हायरल होऊ लागला आहे. कपिलला यामुळे नेटकऱ्यांकडून ट्रोलही केलं जात आहे.

Tags: entertainmentkapil sharmashibani dandekar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Nora Fatehi emotional video

विमानतळावर रडतच आली नोरा फतेही, जवळच्या व्यक्तीच्या निधनाने धक्का, बॉडीर्गार्डने चाहत्याला धक्का मारला अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.