शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आई होण्याची इच्छा, मुलंही दत्तक घ्यायचं होतं पण…; शेफाली जरीवालाची इच्छा अपूर्ण, म्हणालेली, “मानसिकदृष्ट्या…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 28, 2025 | 5:50 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shefali Jariwala Wanted to Be Mother

आई होण्याची इच्छा, मुलंही दत्तक घ्यायचं होतं पण…; शेफाली जरीवालाची इच्छा अपूर्ण, म्हणालेली, "मानसिकदृष्ट्या…"

Shefali Jariwala Wanted to Be Mother : ‘कांटा लगा’ या गाण्याने प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री शेफाली जरीवालाचे वयाचे ४२ व्या वर्षी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला. अशातच अभिनेत्रीच्या मृत्यूचे खरे कारण पोस्ट -मॉर्टम अहवालानंतर येईल. बॉलिवूडमध्ये शेफालीच्या मृत्यूच्या बातमीनंतर सर्वत्र दुःखाची लाट उसळली आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाला तिच्याबद्दल जाणून घ्यायचे आहे. ४१ वर्षीय अभिनेत्रीचे लग्न झाले होते. आणि तिने अभिनेता पराग त्यागीसह लग्नगाठ बांधली. शेफाली जरीवालाला एखादं बाळ दत्तक घ्यायचे होते परंतु अचानक तिचा निर्णय बदलला.

‘टीओआय’ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत शेफालीने सांगितले होते की, तिला आणि तिच्या नवऱ्याला एखादं बाळ दत्तक घ्यायचे आहे. कोरोना मॅजेस्टीमुळे त्यांची योजना लांबणीवर गेली. यावर शेफाली म्हणाली, “मला वाटते की प्रत्येक गोष्टीचा एक काळ आहे. जेव्हा गोष्टी घडायच्या असतात तेव्हाच त्या घडतात”. शेफालीने एखादं बाळ का दत्तक घेतले नाही यासंबंधी कारण देत तिने सांगितले की कोरोना साथीच्या रोगामुळे लॉकडाउनमध्ये सर्व काही बदलले. माझा अजूनही मूल दत्तक घेण्याचा हेतू आहे पण मला भीती वाटते. दोन वर्षांच्या महामारीने मला भविष्याबद्दल अनिश्चित केले आहे. यावेळी मी माझ्या जवळच्या बर्‍याच गोष्टी गमावल्या आहेत. या सर्व गोष्टीत असे दिसते की आयुष्य खूप नाजूक आहे. मला आई होण्यास भीती वाटते, परंतु माझे पती पराग बाळ दत्तक घेण्यास तयार आहेत”.

आणखी वाचा – ड्रेसला दोन्ही बाजूने कट, प्रायव्हेट भाग लपवण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची धडपड, नग्नावस्थेवर कलाकारांचा संताप

View this post on Instagram

A post shared by Shefali Jariwala 🧿 (@shefalijariwala)

शेफाली पुढे म्हणाली, “मी पाहते की जेव्हा आपण त्यासाठी पूर्णपणे तयार असाल तेव्हाच आपण आपल्या मुलास घरी आणले पाहिजे. याचाच अर्थ असा की, केवळ पैशानेच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही आपण तयार असणं आवश्यक आहे. मी याक्षणी माझी पावलं मागे घेतली आहेत आणि मी मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेण्यास थांबले आहे”.

आणखी वाचा – “वेळ आली आहे…”, मृत्यूपूर्वी शेफाली जरीवालाने केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत, आयुष्याबाबत केलेलं भाष्य

शेफाली जरीवालाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती ‘कांटा लगा’ गाण्यासाठी ओळखली जाते. ती ‘बिग बॉस १३’ मध्ये देखील दिसली होती. तसेच ती ‘नच बलीए ५’, ‘नच बलीए ७’ आणि एडल्ट कॉमेडी सीरीज ‘बेबी कम ना’मध्ये दिसली.

Tags: actress deathbollywood newsShefali Jariwala
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Farah Khan Cook Dilip  New House

तीन मजली बंगला, स्विमिंगपूल आणि…; फराह खानचा कुक दिलीपचं गावी आहे टोलेजंग घर, पाहताच बसेल धक्का

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.