सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी २३ जून रोजी एकमेकांबरोबर विवाहगांठ बांधली. तिच्या लग्नाच्या आधीपासून तिचे झहीरबरोबरचे लग्न हे लव्ह जिहाद असल्याच्या टीका तिच्यावर होत होत्या आणि त्या टीका आजही चालूच आहेच. अर्थात यामुळे सोनाक्षी किंवा झहीर यांना काहीही फरक पडत नाहीये. तिच्या लग्नाच्या आधी आणि नंतरही कुटुंबात तणाव असल्याच्या बातम्या येत होत्या. सोनाक्षीचे वडील व ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा व आई पूनम सिन्हा या लग्नावर खूश नाहीत. अशा अनेक चर्चाही रंगल्या. त्याचबरोबर तसेच भाऊ लव सिन्हाही लग्नसोहळ्याला उपस्थित राहिले नव्हता. अशातच आता शत्रुघ्न सिन्हा यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे.
टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “आम्ही अनेक मोठी संकटे पाहिली आहेत. त्यात हे काहीच नाही”. मुलगी हिंदू असून जावई मुस्लिम आहे. त्यामुळे या दोन धर्मातील फरकाबाबत ते असं म्हणाले की, “यात नाराज होण्यासारखे काही नव्हते. आम्ही पण एक सामान्य कुटुंबच आहोत, जय कुटुंबात हे लग्न झाले आहे. यापुढे ते मुलगा लव सोनाक्षी-झहीरच्या लग्नाच्या विरोधात आहे आणि लग्न स्वीकारत नाही याबद्दल असं म्हटले की, “कौटुंबिक गोष्टी कुटुंबातच राहिल्या पाहिजेत. मी म्हटल्याप्रमाणे, कुटुंबात कोणाचे मतभेद नाहीत? आम्ही काही मुद्द्यांवर असहमत आणि वाद घालू शकतो. पण शेवटी आम्ही एक कुटुंब आहोत. आणि आम्हाला कोणीही तोडू शकत नाही”.
यापढे ते “आमच्याकडे इतके लक्ष का गेले, हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगले कळेल. आंतरधर्मीय विवाह होण्याची ही काय पहिलीच वेळ नाही. आमच्या कुटुंबाला प्रचाराच्या मोहिमेचा बळी बनवण्यात आले. माझ्या कुटुंबावर होणारे हल्ले मी खपवून घेणार नाही, हे मी स्पष्ट करतो. एक वडील म्हणून मी माझ्या मुलीसाठी आनंदी आहे आणि तिच्या आयुष्यातील निर्णयांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. तिचा आनंद हाच आमचा आनंद आहे. मला खात्री आहे की, झहीर तिला आनंदी ठेवेल”.
दरम्यान, ७ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर सोनाक्षी व झहीरने गेल्या महिन्यात लग्न केले. सोनाक्षीच्या अपार्टमेंटमध्ये हा विवाहसोहळा पार पडला, ज्यामध्ये कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. नोंदणी पद्धतीने त्यांचा हा विवाहसोहळा पार पडला होता.