शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“हे मी खपवून घेणार नाही”, लेकीने मुस्लिम धर्मात लग्न केल्यामुळे होणाऱ्या टिकेवरुन वडील शत्रुघ्न सिन्हा भडकले, म्हणाले, “कुटुंबावर होणारे हल्ले…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 7, 2024 | 9:38 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shatrughan Sinha talked on marriage of Sonakshi and Zaheer Khan that this is not the first time inter-faith marriage

“मी खपवून घेणार नाही”, लेकीने मुस्लिम धर्मात लग्न केल्यामुळे होणाऱ्या टिकेवरुन वडील शत्रुघ्न सिन्हा भडकले, म्हणाले, “कुटुंबावर होणारे हल्ले...”

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी २३ जून रोजी एकमेकांबरोबर विवाहगांठ बांधली. तिच्या लग्नाच्या आधीपासून तिचे झहीरबरोबरचे लग्न हे लव्ह जिहाद असल्याच्या टीका तिच्यावर होत होत्या आणि त्या टीका आजही चालूच आहेच. अर्थात यामुळे सोनाक्षी किंवा झहीर यांना काहीही फरक पडत नाहीये. तिच्या लग्नाच्या आधी आणि नंतरही कुटुंबात तणाव असल्याच्या बातम्या येत होत्या. सोनाक्षीचे वडील व ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा व आई पूनम सिन्हा या लग्नावर खूश नाहीत. अशा अनेक चर्चाही रंगल्या. त्याचबरोबर तसेच भाऊ लव सिन्हाही लग्नसोहळ्याला उपस्थित राहिले नव्हता. अशातच आता शत्रुघ्न सिन्हा यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे.

टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “आम्ही अनेक मोठी संकटे पाहिली आहेत. त्यात हे काहीच नाही”. मुलगी हिंदू असून जावई मुस्लिम आहे. त्यामुळे या दोन धर्मातील फरकाबाबत ते असं म्हणाले की, “यात नाराज होण्यासारखे काही नव्हते. आम्ही पण एक सामान्य कुटुंबच आहोत, जय कुटुंबात हे लग्न झाले आहे. यापुढे ते मुलगा लव सोनाक्षी-झहीरच्या लग्नाच्या विरोधात आहे आणि लग्न स्वीकारत नाही याबद्दल असं म्हटले की, “कौटुंबिक गोष्टी कुटुंबातच राहिल्या पाहिजेत. मी म्हटल्याप्रमाणे, कुटुंबात कोणाचे मतभेद नाहीत? आम्ही काही मुद्द्यांवर असहमत आणि वाद घालू शकतो. पण शेवटी आम्ही एक कुटुंब आहोत. आणि आम्हाला कोणीही तोडू शकत नाही”.

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

आणखी वाचा – ‘सिंह’ राशीच्या लोकांना नोकरीत बढती तर ‘वृषभ’ राशीच्या लोकांना व्यवसायात नफा, आजचा दिवस नेमका कसा? जाणून घ्या…

यापढे ते “आमच्याकडे इतके लक्ष का गेले, हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगले कळेल. आंतरधर्मीय विवाह होण्याची ही काय पहिलीच वेळ नाही. आमच्या कुटुंबाला प्रचाराच्या मोहिमेचा बळी बनवण्यात आले. माझ्या कुटुंबावर होणारे हल्ले मी खपवून घेणार नाही, हे मी स्पष्ट करतो. एक वडील म्हणून मी माझ्या मुलीसाठी आनंदी आहे आणि तिच्या आयुष्यातील निर्णयांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. तिचा आनंद हाच आमचा आनंद आहे. मला खात्री आहे की, झहीर तिला आनंदी ठेवेल”.

आणखी वाचा – “दोन किंवा पाच लग्न करा पण…”, अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीवर भडकली सुप्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली, “माझा नवरा मुस्लिम असून…”

दरम्यान, ७ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर सोनाक्षी व झहीरने गेल्या महिन्यात लग्न केले. सोनाक्षीच्या अपार्टमेंटमध्ये हा विवाहसोहळा पार पडला, ज्यामध्ये कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. नोंदणी पद्धतीने त्यांचा हा विवाहसोहळा पार पडला होता.

Tags: Bollywood entertainment newsshatrughan sinhasonakshi SinhaZaheer Khan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Bollywood director and producer Karan Johar suffering from body dysmorphia diseases

गेली ४४ वर्षे करण जोहर देतोय ‘या’ गंभीर आजाराशी झुंज, स्वत:च खुलासा करत म्हणाला, “यावर मात करण्याचा अनेकदा प्रयत्न केला पण...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.