बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : …अन् रस्त्यावर उभ्या असलेल्या मुलांना बॉबी देओलने दिल्या ५०० रुपयांच्या नोटा, अभिनेत्याचा मोठं मन पाहून कौतुकाचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 22, 2024 | 2:32 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bobby Deol Viral Video

Video : ...अन् रस्त्यावर उभ्या असलेल्या मुलांना बॉबी देओलने दिल्या ५०० रुपयांच्या नोटा, अभिनेत्याचा मोठं मन पाहून कौतुकाचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता बॉबी देओल बऱ्याच वर्षांपासून चर्चेत नव्हता. गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘ॲनिमल’ या चित्रपटामुळे तो चर्चेत आला. या चित्रपटातून बॉबी हिंदी सिनेसृष्टीत दमदार कमबॅक केलं असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. ‘ॲनिमल’ चित्रपटाच्या अफाट यशानंतर आणि बॉबी देओलच्या अभिनयाच्या अनेक बातम्या रंगल्या. दरम्यान, बॉबी देओलच्या नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये बॉबी देओल दोन गरीब मुलांना पैसे देताना दिसत आहे. (Bobby Deol Viral Video)

बॉबी देओलचा समोर आलेला व्हिडीओ हा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याशिवाय, चाहतेही त्याच्या या व्हिडीओला भरभरुन पसंती दर्शविताना दिसत आहेत. बॉबी देओल हा त्याच्या साध्या राहणीमानासाठी आणि उदारतेसाठी प्रसिद्ध आहे. अशातच समोर आलेला हा व्हिडीओ त्याच्या स्वभावाचा खात्रीशीर पुरावा आहे.

आणखी वाचा – बहिणीच्या लग्नासाठी शिवा स्वतःचं गॅरेज गहाण ठेवणार का?, ‘शिवा’ मालिकेमध्ये पुढे काय घडणार?, प्रोमो पाहून वाढली उत्सुकता

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

पापाराझींद्वारे बॉबीचा एक लेटेस्ट व्हिडीओ सोशल मीडियावरून समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये असे पाहायला मिळत आहे की, बॉबीला दोन गरीब मुलांनी घेरले आहे, जे त्याच्याकडे काही पैसे मागत आहेत. यादरम्यान अभिनेता खिशातून ५०० रुपयांच्या दोन नोट काढतो आणि या दोन लहान मुलांना देतो, त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो. दोन्ही मुलं वस्तू विक्री करत असतात, ते बॉबीला त्या वस्तू विकत घेण्यासाठी सांगतात, मात्र बॉबी त्या वस्तू विकत न घेता त्यांना मदत करतो.

आणखी वाचा – ४९व्या वर्षी ३४ मुलींची आई आहे प्रिती झिंटा, जुडवा मुलांनाही दिला जन्म, मुलींना परदेशामधून भेटायलाही येते अन्…

एवढेच नाही तर बॉबी देओलने या दोन मुलांबरोबर फोटोही क्लिक केलेले पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओवर कमेंट करत चाहते या अभिनेत्याला रिअल लॉर्ड बॉबी अशी उपाधी देत ​​आहेत आणि त्याचे खूप कौतुक करत आहेत. दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटानंतर बॉबी देओल ‘कांगुवा’ या चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्याबरोबर साऊथचा सुपरस्टार सूर्या दिसणार आहे. नुकताच ‘कांगुवा’चा धमाकेदार टीझरही प्रदर्शित झाला आहे, जो पाहून चाहत्यांमध्ये या साऊथ चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.

Tags: bobby deolBobby Deol Viral Videobollywood actorentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
ankita lokhande mother in law

अंकिता लोखंडेचा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचली सासू, आता मात्र सूनेचं केलं कौतुक, म्हणाली, "आमची अंकिता तर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.