बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अमेरिकेतील नोकरी गमावली, कर्ज अन्…; ‘शार्क टँक’चे जज अनुपम मित्तल यांची काही वर्षांपूर्वी इतकी बिकट होती परिस्थिती, स्वतःच केला खुलासा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 22, 2024 | 2:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shark Tank India Judge Anupam Mittal

अमेरिकेतील नोकरी गमावली, कर्ज अन्...; 'शार्क टँक'चे जज अनुपम मित्तल यांची काही वर्षांपूर्वी इतकी बिकट होती परिस्थिती, स्वतःच केला खुलासा

‘शार्क टँक इंडिया’ या शोमधून परीक्षक आणि ‘शादी डॉट कॉम’चे संस्थापक, सीईओ अनुपम मित्तल यांनी आजवर बरीच लोकप्रियता मिळवली आहे. याशिवाय, अनुपम हा त्याच्या आलिशान जीवनशैलीसाठीही प्रसिद्ध आहे आणि तो अनेकदा त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन याची झलक शेअर करताना दिसतो. मात्र, अनुपमलाही त्याच्या वयाच्या २०व्या वर्षी आर्थिक व मानसिक समस्यांशी झुंज द्यावी लागली. आता एका मुलाखतीत त्याने याबाबत खुलेपणाने भाष्य केलं आहे. (Shark Tank India Judge Anupam Mittal)

अनुपम मित्तलने अलीकडेच रणवीर अल्लाबदियाच्या एका पॉडकास्टमध्ये मुलाखत दिली. यावेळी त्याने त्याच्या आयुष्यबाबत भाष्य केलं. अनुपम याने त्याच्या आयुष्यातील चढ-उतरांबाबत भाष्य केलं. नोकरीऐवजी व्यवसायात जाण्याचा विचार केव्हा केला याबाबत त्याला विचारण्यात आले. त्याबद्दल बोलताना अनुपम म्हणाला की, “पूर्वी त्याचं काम आणि साधं आयुष्य होतं, पण याच गोष्टीने त्याला सगळ्यात जास्त घाबरवलं होतं. त्याऐवजी, त्याला आयुष्यात मोठी कामे करायची होती”.

आणखी वाचा – “अजूनही आम्ही भेटतो आणि…”, पत्नीसह घटस्फोट घेण्यावरुन अनंत जोग यांचं भाष्य, म्हणाले, “फोन करुन जेवायला बोलावते कारण…”

View this post on Instagram

A post shared by Anupam Mittal (@anupammittal.me)

या संवादात अनुपम यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांच्या प्रवासाची आठवणीही सांगितली. याबद्दल बोलताना त्या वेळेबद्दल तो म्हणाला, जेव्हा त्याने आपली नोकरी गमावली, जी त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट वेळ ठरली. यानंतर, त्याने त्या वेळी चिंता आणि दहशतीच्या काळात कसा सामना केला हे देखील शेअर केले. अनुपम म्हणाला, “२५ वर्षांपूर्वी माझी अमेरिकेतील नोकरी गेली, मी खूप कर्जात बुडालो होतो आणि तो माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता. तेव्हा मला माझा पहिला पॅनिक अटॅक आला आणि ही सर्वात वाईट गोष्ट होती. बऱ्याच लोकांना मानसिक आरोग्य समस्या समजत नाहीत परंतु याबद्दल जाणून घेणे खूप महत्वाचे आहे”.

आणखी वाचा – “७५ पेक्षा जास्त वय असूनही…”, बिनधास्त मुलगीच्या आजीचीही निलेश साबळेच्या कार्यक्रमात एन्ट्री, उत्साह पाहून म्हणाला, “या वयात…”

अनुपम मित्तल यांनी अभिनेत्री आंचल कुमारशी लग्न केले आहे. आंचल ‘बिग बॉस’च्या चौथ्या सीझनचा एक भाग होती. या जोडप्याने २०१३ मध्ये लग्न केले आणि १६ डिसेंबर २०१७ रोजी त्यांच्या बाळाला जन्म दिला. त्यांनी त्यांच्या लाडक्या लेकीचे नाव एलिसा ठेवले.

Tags: anupam mittalanupam mittal struggleentertainmentShark Tank IndiaShark Tank India Judge Anupam Mittal
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Marathi actress Mrunal Dusanis home

सुंदर सजावट, प्रशस्त जागा अन्...; अमेरिकेत असं आहे मृणाल दुसाणीसचं घर, पाहा Inside Photos

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.