शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तुमच्या मुलींना असं फसवलं जाईल तेव्हा..’ म्हणत ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावरून शरद पोंक्षे झाले व्यक्त

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 8, 2023 | 12:33 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
The Kerala Story post Sharad Ponkshe

The Kerala Story post Sharad Ponkshe

सध्या सोशल मीडियावर ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळतेय. या चित्रपटाला दोन्ही बाजूंनी प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळताना दिसतोय. काहींनी या चित्रपटाला, चित्रपटाच्या कथेला ट्रोल केलं आहे. दक्षिण भारतात तर चित्रपटाचे शो रद्द करण्यात आले आहेत. लव्ह जिहाद या विषयावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाचे अनेक स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. नुकताच ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून अभिनेते शरद पोंक्षे यांनी देखील पाहिला. चित्रपट पाहिल्यावर त्यांची अस्वस्थता त्यांना शांत बसू देत नव्हती, शेवटी न राहवून त्यांनी या चित्रपटा बाबतीत एक व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केला आहे.(The Kerala Story post Sharad Ponkshe)

शरद पोंक्षे यांनी व्हिडिओ शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. या व्हिडिओमध्ये ते म्हणाले आहेत, ”नमस्कार, मी शरद पोंक्षे. आज मी तुमच्या समोर आलोय त्याचं कारणही तसंच आहे. कारण काल रात्री मी ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट पाहिला आणि मी रात्रभर झोपू शकलो नाही इतका अस्वस्थ झालो ”

पाहा काय म्हणाले शरद पोंक्षे (The Kerala Story post Sharad Ponkshe)

photo credit : google

‘म्हणून मी सर्व हिंदुस्तानी बंधूना आणि भगिनींना विनंती करतो की हा चित्रपट तुम्ही चित्रपट गृहात जाऊन पाहा. मी चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांचे आभार मानतो की त्यांनी इतका महत्त्वाचा, संवेदनशील आणि धाडसी विषय हाताळला.” ”हा चित्रपट पाहून मी विचार केला की हे आपल्याच बाबतीत का होतं. हिंदू मुलींना लव्ह जिहादमध्ये कसं अडकवलं जातं आणि त्या कशा अडकतात. तर त्याचं कारण आहे की आपल्याला आपली संस्कृती माहीत नाही, परंपरा माहीत नाही.”(The Kerala Story post Sharad Ponkshe)

हे देखील वाचा – नम्रता करतेय लेकाला मिस, ‘एकटी एकटी घाबरलीस ना’ गाणं गात रुद्राज देतोय नम्रताला धीर

”आपल्या देवांची माहिती नाही, त्याची उत्पत्ती माहीत नाही. एखाद्या देवाला हेच वाहन का हेही माहीत नसतं. कारण आपण आपल्या मुलांना सांगत नाही. आपण मॉडर्न होण्याच्या नादात आपल्या मुलांना आपलीच संस्कृती शिकवली नाही. म्हणूनच ते आपल्या हिंदू मुलींना जाळ्यात ओढतात आणि त्यांना फसवतात.”

”आणि प्रेम ही अशी गोष्ट आहे, जिथे कुणीच काही बोलू शकत नाही. आपल्या मुलींना फसवलं जातं. म्हणून मी आवाहन करतो, की प्रत्येक हिंदू कुटुंबाने, तरुण मुलींनी हा चित्रपट पाहा. याला काही पक्ष विरोध करत आहेत, पण त्याकडे लक्ष देऊ नका. हा चित्रपट जाऊन बघा म्हणजे कळेल किती भयानक वास्तव आहे.(The Kerala Story post Sharad Ponkshe)

हे देखील वाचा – ‘तुमच्या मुलीपेक्षा माझी बाजू’…सासऱ्यांसाठी उमेशची खास पोस्ट

”काही पक्ष हा चित्रपट खोटा आहे म्हणून ओरडतायत. पण जोपर्यंत आपल्या घरात आग लागत नाही तोवर हे कळत नाही. जेव्हा तुमच्या मुलींना असं फसवलं जाईल तेव्हा तुमचे डोळे उघडणार आहेत का? त्यामुळे मी विनंती करतो.. या जिहाद पासून आपल्या मुलींना वाचवायचं असेल तर कृपया हा चित्रपट पाहा.. कारण वेळ निघून गेली तर आपल्या हातात काहीच उरणार नाही.. त्यामुळे सावध व्हा..”अशी पोस्ट शरद पोंक्षे यांनी केली आहे.

Tags: entertainmentits majjalatest moviemoviesharad ponkshethe kerala storytroll movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
kareena kapoor Radhika Aapte

मराठी अभिनेत्री तिच्या मागे धावत गेली-करीना आणि राधिका आपटेचा किस्सा व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.