मंगळवार, जून 3, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी ब्राम्हण आहे, सवलत नको…”, पुष्कर जोगच्या जातीवरील प्रकरणावर शरद पोंक्षेंचीही प्रतिक्रिया, म्हणाले,, “ते घरी आल्यानंतर…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 30, 2024 | 12:20 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sharad Ponkshe gave his reaction on Pushkar Jog's statement about BMC staff see the details

"मी ब्राम्हण आहे, सवलत नको…", पुष्कर जोगच्या जातीवरील प्रकरणावर शरद पोंक्षेंचीही प्रतिक्रिया, म्हणाले,, "ते घरी आल्यानंतर…"

सध्या राज्यभर सर्वत्र मराठा आरक्षणासंदर्भात सर्वेक्षण करण्यासाठी महानगरपालिकेची काही कर्मचारी प्रत्येकाच्या घरी जाऊन जातीनिहाय सर्वेक्षण करत आहेत. यावर अभिनेत्री केतकी चितळेपाठोपाठ अभिनेता पुष्कर जोगनेही उद्धट वर्तन केले असल्याचे पहायला मिळाले. पुष्करने जातगणना करायला आलेली व्यक्ती ही जर बाई नसती तर मी त्या दोन लाथा घातल्या असत्या” असं म्हणत वादग्रस्त पोस्ट समाजमाध्यमांवर लिहिली होती. यावर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

पुष्करने लिहिलेल्या या पोस्टमुळे त्याला नेटकऱ्यांसह अनेक मराठी कलाकारांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. पुष्करने लिहिलेल्या या पोस्टवर अनेकांनी टीका करत त्याला चांगलेच धारेवर घटले आहे. नुकतीच अभिनेते किरण माने, संदेश उपशाम यांनी पुष्करच्या या कृतीचा निषेधार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. अशातच अभिनेता अभिजीत केळकरनेही फेसबुकवर पोस्ट शेअर करत पुष्करच्या या कृतीबद्दल त्याची नाराजी व्यक्त केली आहे. तसेच यानिमित्ताने त्याला काही प्रश्नदेखील विचारले आहेत.

आणखी वाचा – अक्षय कुमारच्या लेकीला कुत्रा चावला अन्…; बायकोने सांगितला ‘तो’ थक्क करणारा प्रसंग, म्हणाली, “त्याने…”

अभिजीतने लिहिलेलल्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्समध्ये अभिजीतच्या या पोस्टला समर्थन दिले असून पुष्करच्या वर्तणूकीबद्दल टीका केली आहे. या पोस्टवर अभिनेते शरद पोंक्षे यांनीही कमेंट करत अभिजीतच्या पोस्टचे कौतुक समर्थन केले आहे. शरद पोंक्षे यांनी या पोस्टखाली कमेंट्समध्ये असे म्हटले आहे की, “माझ्या घरीसुद्धा नगरपालिकावाले आले होते. मी त्यांना चहापाणी विचारलं. मी ब्राम्हण आहे, मला कसलीच सवलत नको, म्हणून नोंदही नको असं नम्रपणे त्यांना सांगितलं. त्यावर तेही हसून निघून गेले.”

आणखी वाचा – पुष्कर जोग व केतकी चितळेने जातीवादावरुन केलेल्या विधानावर किरण मानेंच ऑब्जेक्शन, व्हिडीओ शेअर करत व्यक्त केलं मत, म्हणाले….

यापुढे शरद पोंक्षे यांनी कमेंटमध्ये असे म्हटले की, “दरवाजावर कुणीही आलं तरी त्याचा आदर करणं ही आपली संस्कृती आहे. आपल्याला नकारसुद्धा नम्रपणे देता आला पाहिजे.” दरम्यान, या पुष्करनच्या विधानामुळे झालेल्या गदारोळानंतर “मी केवळ माणूसकी हाच धर्म मानतो. बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान माझ्याकडून केलं गेलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो.” असं म्हणत माफीही मागितली. पण तरीदेखील अजूनही अनेक सोशल मीडिया माध्यमांवर त्याच्यावर संताप व्यक्त केला जात आहे.  

Tags: entertainment newsmarathi actormarathi entertainment newsMarathi newspushkar jogPushkar Jog BMC Staff PostsPushkar Jog Postssharad ponksheपुष्कर जोगपुष्कर जोग पोस्टपुष्कर जोग बीएमसी कर्मचारी पोस्टमनोरंजन बातमीमराठी अभिनेतामराठी बातमीमराठी मनोरंजन बातमीशरद पोंक्षे
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

seema kapoor torchered by own mother
Entertainment

आईकडून मारहाण, टॉर्चर अन् हाल; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला वाईट काळ, जन्मदातीच वैरी ठरली तेव्हा…

जून 2, 2025 | 7:00 pm
Premachi Goshta fame Swarda Thigales car accident
Entertainment

‘प्रेमाची गोष्ट’मधील मुक्ताचा अपघात, गाडी चालवताना झोप लागली अन्…; अभिनेत्रीचं मोठं नुकसान

जून 2, 2025 | 5:58 pm
Vaishnavi Hagawane Death
Entertainment

वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ कोणाजवळच राहीना, आईविना लेकराचे रडून-रडून हाल, हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर

जून 2, 2025 | 5:00 pm
Radhika Apte Motherhood
Entertainment

बाळ होण्याच्या एक दिवस आधीपर्यंत केलं काम, अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतील सत्य, म्हणाली, “इथं काम करणं…”

जून 2, 2025 | 3:30 pm
Next Post
Abhijeet Kelkar On Pushkar Jog

“जात सांगायची लाज…”, पुष्कर जोगच्या ‘त्या’ प्रकरणावरुन अभिजीत केळकरही भडकला, म्हणाला, “इतकाच राग आला तर…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.