बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टीबद्दल नुकतीच एक बातमी समोर येत आहे. अभिनेत्रीला एक दुर्मिळ आजार झाला असून या एका व्हिडीओद्वारे तिने या आजाराबद्दलची माहितीही शेअर केली आहे. अभिनेत्रीला ‘एंडोमेट्रिओसिस’ नावाचा आजार जडला होता, त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि या शस्त्रक्रियेनंतर तिने हॉस्पिटलमधून एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच तिला झालेल्या या आजाराची माहितीही दिली आहे.
शमिताने हॉस्पिटलच्या बेडवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओमध्ये ती असं म्हणत आहे की, “ज्या महिला हा व्हिडीओ पाहत आहेत, त्यांनी जरा लक्ष द्या किंवा गुगलवर जाऊन ‘एंडोमेट्रिओसिस’ या आजाराविषयी माहिती शोधण्याचा प्रयत्न करा. कारण ही समस्या काय आहे? हे तुम्हाला माहित असले पाहिजे. यामुळे खूप वेदना आणि खूप त्रास होतो. जेव्हा तुम्हाला तुमच्या शरीरात कोणत्याही कारणास्तव वेदना होतात तेव्हा तुमच्या शरीराचे ऐका. दुर्लक्ष करू नका”.
तसेच या व्हिडिओच्या खाली कॅप्शनमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “तुम्हाला माहीत आहे का की जवळपास ४०% महिलांना ‘एंडोमेट्रिओसिस’चा त्रास होतो आणि आपल्यापैकी बहुतेकांना या आजाराची माहितीदेखील नसते. मला माझ्या दोन्ही डॉक्टरांचे, माझ्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नीता वार्टी आणि माझ्या जीपी डॉ. सुनीता बॅनर्जी यांचे आभार मानायचे आहेत की, त्यांनी माझ्या वेदनांचे मूळ कारण शोधून काढले”.
आणखी वाचा – राखी सावंत रुणालयात दाखल, उपचारादरम्यानचे फोटो व्हायरल, नेमकं झालं तरी काय?
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “माझ्या डॉक्टरांचे मी आभार मानते की, त्यांनी माझ्या वेदनांचे खरे कारण सापडेपर्यंत त्यांचे संशोधन थांबवले नाही. आता माझा हा आजार शस्त्रक्रियेद्वारे माझ्या शरीरातून काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे आता मी चांगल्या आरोग्याची आणि अधिक वेदनामुक्त दिवसांची वाट पाहत आहे.”
आणखी वाचा – साक्षी, महिपतला चैतन्य रंगेहात पकडणार, मधुभाऊंची सुटका करण्यास सापडणार पुरावा, सायली-अर्जुन होणार का वेगळे?
दरम्यान, अभिनेत्रीच्या या व्हिडीओखाली तिच्या अनेक शुभचिंतकांनी तिला लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत. “लवकर बरी हो, काळजी घे, तू यातून लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी देवाचरणी प्रार्थना करतो” अशा अनेक कमेंट्स करत तिला धीर देण्याचा व काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.