जेष्ठ अभिनेत्री आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या उत्तरा बावकर गेल्या काही दिवसापासून दीर्घ आजाराने त्रासल्या होत्या. याच आजारावर एका खासगी रुग्णायालात त्यांच्या वर उपचार सुरु होते, परंतु,उपचारादरम्यान वयाच्या ७९व्या वर्षी त्यांचे निधन झाले.(Uttara Baokar)
मराठी तसेच हिंदी सिने सृष्टीमध्ये त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला आहे.उडाण,अंतराळ यांसारख्या अनेक मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.आणि याच मालिकांनी त्यांना घर घरात पोहचवल छोट्या पडद्या प्रमाणे मोठा पडद्यावर देखील त्यांनी त्यांच्या कामाची छाप पाडली.
जाणून घ्या उत्तरा बावकर यांच्याविषयी (Uttara Baokar)
यात्रा, तमस,एक दिन अचानक,तक्षक,जब लव्ह हुआ असे अनेक हिंदी चित्रपटांबरोबर दोघी,वास्तुपुरुष,उत्तरायण असे मराठी चित्रपटात देखील त्या पहायला मिळाल्या.एक दिन अचानक या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी १९८८ साली त्यांना नॅशनल फिल्म अवॉर्ड चा सर्वात्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला आहे.तसेच १९८४ साली अभिनयासाठी संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार देखील मिळाला आहे.(Uttara Baokar)

चित्रपट, मालिका, नाटक अशा सर्व माध्यमातून मोठ्या काळापर्यंत त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. नव्वदच्या दशकातील गाजलेल्या अभिनेत्रीनंपैकी उत्तरा बावकर या एक आहेत.अशा लोकप्रिय अभिनेत्री उत्तरा बावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.