शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन; व्यासपीठावरच घेतला अखेरचा श्वास

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 13, 2024 | 9:25 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satish Joshi Passed Away

ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन; व्यासपीठावरच घेतला अखेरचा श्वास

मराठी कलाविश्वात ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांनी काल (१२ मे रोजी) अखेरचा श्वास घेतला. मराठी कलाविश्वातून सतीश यांच्या निधनाची दुःखद बातमी समोर आली आहे. रंगोत्सवात व्यासपीठावरच सतीश जोशी यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती त्यांचे मित्र राजेश देशपांडे यांनी दिली. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे अनेकांना धक्का बसला आहे. (Satish Joshi Passed Away)

राजेश देशपांडे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून सतीश यांच्या निधनाची बातमी चाहत्यांसह शेअर केली. सतीश जोशी यांचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं, “आमचे ज्येष्ठ मित्र अभिनेते सतीश जोशी यांचे आज रंगोत्सवात स्टेजवरच दुःखद निधन झाले. निधनापूर्वी त्यांनी अभिनयपण केला होता. ओम शांती ओम”. सतीश जोशी यांना देखील रंगभूमीवरच देवाज्ञा झाली. ‘सृजन द क्रिएशन’ या संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त एक कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमात सतीश जोशी देखील सहभागी झाले होते. सृजनोस्तव या रंगोत्सवाचा कार्यक्रम सुरु असतानाच त्यांचे निधन झाले.

आणखी वाचा – …अन् मंचावर आईला पाहून ढसाढसा रडू लागली हेमांगी कवी, खास पोस्ट शेअर करत म्हणाली, “लोकांचे टोमणे, घरातल्यांची नाराजी…”

अभिनेते अतुल काळे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सतीश यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांचा एक फोटो शेअर करत, “जोशी गुरुजी यांचं आज निधन झालं. त्यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला खूप सपोर्ट केला होता. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. ओम शांती”.

आणखी वाचा – चार वर्षांनंतर मृणाल दुसानिसचं मालिकाविश्वात कमबॅक, पहिल्यांदाच स्वतः केला खुलासा, म्हणाली, “कामाला सुरुवात…”

View this post on Instagram

A post shared by Atul Kale (@atulkale25)

सतीश जोशींनी अनेक चित्रपट, मालिका, नाटकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘भाग्यलक्ष्मी’ या मालिकेतील त्यांच्या भूमिकेला विशेष लोकप्रियता मिळाली. ‘यशोदा गोष्ट श्यामच्या आईची’ या मालिकेत ते शेवटचे झळकले. दिग्दर्शक विरेंद्र प्रधान यांच्या बहुतेक मालिकांमध्ये त्यांनी काम केलं होतं.

Tags: marathi actorsatish joshisatish joshi deathsatish joshi passed away
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Paaru Serial Update

पारूमुळे होणार अहिल्यादेवींचा गैरसमज, किर्लोस्कर बंगल्यापासून ठेवणार का तिला दूर?, मालिकेला मिळणार नवं वळण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.