लोकप्रिय लोकांच्या यादीत खूप कमी नाव अशी मिळतात ज्यांच्या बद्दल कोणत्याही अफवा पसरवल्या जात नाहीत. पण अनेक कलाकारांना काही अफवांना समोर जावं लागत. असच काही झालेलं अभिनेत्री सायली संजीव आणि क्रिकेट जगतातील प्रसिद्ध खेळाडू ऋतुराज गायकवाड(Ruturaj gaikwad) यांच्या नात्याबद्दल. सायलीच्या फोटो वरील ऋतुराजच्या कमेंटमुळे सर्वत्र यांच्या नात्याबद्दल अफवा पसरवल्या जाऊ लागल्या. या संदर्भात सायली ने स्वतः खुलासा करत आम्ही फक्त मित्र आहोत बाकी काही नाही असं सांगितलं होत.(Sayli Sanjeev Ruturaj Gaikwad)

आता मात्र या चर्चांवर कायमचा पूर्णविराम लागला आहे. नुकतंच ऋतूराजच लग्न झालं आणि सायली ने आपल्या मित्राला आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीला फोटो पोस्ट करत शुभेच्छा देखील दिल्या आहेत. यंदाच्या आयपीएल मधील ऋतुराजच्या खेळीने महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स यंदाची ट्रॉफी जिंकण्यात मोलाची मदत झाली.

सामना संपल्या नंतर ऋतुराज आणि त्या बायकोनी महेंद्र सिंग धोनी याच्या सोबतचा एक फोटो पोस्ट केला होता त्यावर देखील कमेंट करत सायलीने त्या दोघांना शुभेच्छा दिल्या होत्या.(Sayli Sanjeev Ruturaj Gaikwad)
आता सायली ने तिच्या इंस्टाग्राम अकॉउंट वरून ऋतुराज आणि त्याची बायको उत्कर्षाला ” मी तुम्हा दोघांसाठी खूप आनंदी आहे. तुम्हाला खूप शुभेच्छा” असं कॅप्शन देत शुभेच्छा दिल्या आहेत. सायली आणि ऋतुराज हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत हे आता पसरणाऱ्या अफवांना योग्य ऊत्तर आहे असं म्हणायला हरकत नाही.(Sayli Sanjeev Ruturaj Gaikwad)