अभिनय असो वा सामाजिक कार्य या दोन्ही गोष्टींमध्ये सक्रिय असणारी काही नावं जी नेहमी चर्चेत असतात ती म्हणजे अभिनेते नाना पाटेकर, अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेते सयाजी शिंदे. या अभिनेत्यांचं निसर्ग प्रेम सर्वन्यात आहे. झाड लावा, झाड जगवा हा संदेश फक्त शाळे पुरता मर्यादित राहिला असावा अशी परिस्थती असताना यांसारख्या अभिनेत्यांनी पुढाकार घेऊन समस्त राज्य निसर्गमय करण्याचा ध्यास घेतला आणि समस्त नागरिकांना या प्रति जागरूक करून प्रोत्साहन देण्याचं काम केलं.(sayaji shinde)
====
हे देखील वाचा – “आमच्या घरी एक राजकारणी यायचे त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड माज दिसायचा”मिलिंद गवळी यांची ती पोस्ट चर्चेत
नाम फॉऊंडेशनच्या मार्फत वृक्षारोपणाचं कार्य संपूर्ण महाराष्ट्रभर राबवलं जात तर सयाजी शिंदे सहयाद्री देवराई मार्फत हे निर्सग संगोपनाचा ध्यास वाढवतात. अनेक कार्यकर्मकांमध्ये सयाजी शिंदे यांनी झाडांबद्दलच त्यांचं प्रेम नेहमी व्यक्त केलं आहे. “कलाकारा पेक्षा झाडं महत्वाची” असं हि त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात सांगितलं होतं. फक्त मराठीच नाही तर बॉलीवूड आणि टॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सुद्दा सयाजी शिंदे यांच्या नावाचा, अभिनयाचा दरारा आहे.(sayaji shinde)

चाहते त्यांच्या अभिनयावर जितकं प्रेम करतात तितकाच त्यांच्या निसर्गप्रेमावर ही करतात. नुकताच एका कार्यक्रमात याचं निसर्गप्रेमाविषयी बोलताना सयाजी शिंदे म्हणाले ‘ माझं माझ्या आई वर खूप प्रेम आहे आणि मी तिला ५०० वर्षे जगवणार आहे’ आता सयाजी शिंदे हे कस शक्य करून दाखवणार हे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. ते पुढे म्हणाले ‘ मी माझ्या आईला म्हणालो होतो की तू ५०० वर्षे जिवंत राहणार नाहीस पण माझं तुझ्यावर प्रेम आहे मी तुला जिवंत ठेवणार ५०० वर्षे मी तुझ्या वजना एवढ्या देशी झाडांच्या बिया लावेन त्यातून उगवणाऱ्या फुलांच्या सुगंधाच्या रूपात तू ५०० वर्षे दरवळत राहशील.’ सयाजी शिंदे यांच्या या कल्पनेवर सर्वानी टाळया वाजवून आनंद व्यक्त केला.
सयाजी शिंदेंचं मातृप्रेम आणि निसर्गप्रेम हे जगजाहीर आहे. लवकरच सयाजी शिंदे नागराज मंजुळे यांच्या आगामी घर बंदूक बिर्याणी या चित्रपटात दिसणार आहेत.