काही दिवसांपासून सोशल मीडियाला लागलेली ‘वाळवी’ नक्की आहे तरी काय यांचं रहस्य प्रेक्षकांसमोर आलं. मागली काही दिवसांपासून सोशल मीडिया वर वाळवी हे नाव सर्वांना आकर्षित करत होतं . दिगदर्शक परेश मोकाशी यांची अनोखी कलाकृती असलेला हा वाळवी चित्रपट नक्की आहे तरी काय हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना आतुरता होती. (vaalvi)
====
हे देखील वाचा – ‘मी माझ्या आईला ५०० वर्षे जगवणार’ सयाजी शिंदे यांचं विधान चर्चेत
====
अखेर १३ जानेवारी २०२३ रोजी चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. ज्यात अभिनेता सुबोध भावे, स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री अनिता दाते, शिवानी सुर्वे यांची अप्रतिम केमेस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली. ‘वाळवी’ हा मराठीतील पहिला थ्रिलकॅाम सिनेमा आहे.
काय होती वाळवीची कथा?
चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी आणि अनिता दाते नवरा बायको म्हणून काम असून ते आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात. मात्र हा स्वप्नीलने आखलेला डाव असून यात त्याला शिवानी मदत करत असल्याचे दिसते. क्षणोक्षणी कुतूहल वाढवणारा आणि गूढ असणाऱ्या ‘वाळवी’त स्वप्नील आणि शिवानीचा मनसुबा पूर्ण होणार की, आखलेला डाव फिरणार? ट्रेलरच्या शेवटी सुभोड भावाची एन्ट्री होते आणि विषयाला कलाटणी मिळणार का हा विचार मनात येतो? सुबोधकडे असे नक्की काय गुपित आहे? वाळवीचा या सगळ्याशी काय संबंध? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना वाळवी रिलीज झाल्यानंतर मिळाली आणि प्रेक्षक ते पाहून चांगलेच भारावलेले दिसले.(vaalvi)

वाळवी २ येणार प्रेक्षकांच्या भेटीला
चित्रपट्याच्या तुफान याशानिमित्त आणि वाळवी चित्रपटाचे दिगदर्शक परेश मोकाशी यांच्या वाढदिवसानिमित्त एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टी मध्ये वाळवी चित्रपटातील सर्व कलाकार, निर्माते अन्य कलाकार उपस्थित होते. वाळवीच्या यशानंतर झी स्टुडिओस जे सर्वेसर्वा मंगेश कुलकर्णी यांच्या कडून आता ‘वाळवी २’ ची घोषणा केली आहे. वाळवी २ हा चित्रपट लवकरच येणार असल्याचं सांगित मधुगंधा याच्यावर काम करत असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
चित्रपटा बद्दल काय म्हणाले परेश मोकाशी?
पुढे ते म्हणाले वाळवी २ चित्रपटाचे अपडेट मी अधूनमधून देत जाईन. पुढे येणाऱ्या चित्रपटाच्या भागात नवीन गोष्टी पाहायला मिळतील असेही त्यांनी सांगितले आहे. चित्रपटाच्या घोषणेमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आता वाढली आहे. रहस्य आणि कॉमेडी हे या चित्रपटाचं प्रमुख आकर्षण आहे असं दिगदर्शक परेश मोकाशी म्हणतात.(vaalvi)
झी स्टुडिओज नेहमीच नवीन, वेगळ्या विषयांना प्राधान्य त्यांच्या सोबत काम करतानाचा आनंद वेगळा असतो असं ही परेश यांनी सांगितलं. तर आता वाळवी २ कोणत्या पध्द्तीने प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.