कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य व त्यांचे पडद्यावरील आयुष्य यात खूपच तफावत असते. अनेकदा कलाकार आपल्या चेहऱ्यावरील दु:ख लपवून केवळ रसिकांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी झटत असतात. कलाकारांच्या आयुष्यात कितीही दु:ख, संकटं आली तरी त्यावर मात करत कलाकार कायमच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. अशाच एका दु:खद प्रसंगानंतर ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी शूटिंगवर परतल्या आणि याबद्दल त्यांनी स्वत: सांगितले आहे.
३० मे रोजी सविता मालपेकर यांच्या आईंचे निधन झाले. वृद्धापकाळामुळे त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यामुळे गुरुवार ३० मे रोजी त्यांची प्राणज्योत माळवली. यानंतर सविता मालपेकर त्यांच्या आईंचा दहावा विधी होताच ‘शिवा’ मालिकेच्या सेटवर पोहचल्या. ‘शिवा’ मालिकेत त्या बाईआजी ही भूमिका साकारत आहेत. यावेळी ‘इट्स मज्जा’बरोबर संवाद साधताना सविता यांनी त्यांच्या आईच्या निधनाबद्दल सांगितले. यावेळी त्यांनी “कलाकारांना त्यांचे वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्य यात समोतोल साधत काम करावे लागतं” असं म्हणत या दु:खद प्रसंगाबद्दल सांगितले.
यावेळी त्या असं म्हणाल्या की, “माझ्यावर खूप मोठा आघात झाला आहे. झी मराठीवर ‘शिवा’ ही मालिका चालू असून यात सध्या लग्नाचे कथानक सुरु आहे. पण नुकतीच माझी आई गेली. त्यामुळे तिचे निधन झाल्यानंतर दहावा विधी होऊन मी लगेच शूटवर आले. दु:ख आहे ते आहेच, पण ते दु:ख बाजूला ठेवून मी शूटिंगवर परत आले”.
आणखी वाचा – “मालिकांच्या चढाओढीमुळे शीर्षकगीतांचा बळी…’’, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “एक एक सेकंदही…
यापुढे सविता मालपेकर असं म्हणाल्या की, “शो मस्ट गो ऑन. माझं दु:ख हे सेटवरून घरी गेल्यावर असतं. पण जेव्हा मी सेटवर असते तेव्हा मी माझ्या भूमिकेत असते. तसंच मी आज ‘शिवा’च्या सेटवर बाईआजी या भूमिकेत आहे. त्यामुळे अशाप्रकारे मी वैयक्तिक आयुष्य व व्यावसायिक आयुष्यात समतोल साधते”. दरम्यान, झी मराठी वहिनीवरील ‘शिवा’ या मालिकेत लग्नाचे कथानक सुरु असून सविता मालपेकरांनी या मालिकेत बाईआजी ही व्यक्तिरेखा साकारली आहे.