बुधवार, जुलै 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

विदर्भाचा युवा दिग्दर्शक ठरतोय मराठी हॉररचा नवा चेहरा, ‘घबाडकुंड’च्या दिग्दर्शनाने जिंकली मनं

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 21, 2026 | 11:20 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi Film Director

विदर्भाचा युवा दिग्दर्शक ठरतोय मराठी हॉररचा नवा चेहरा, 'घबाडकुंड'च्या दिग्दर्शनाने जिंकली मनं

Marathi Film Director : मराठी चित्रपटसृष्टीत सातत्याने नवे प्रयोग करत यशाची नवी उंची गाठणाऱ्या युवा दिग्दर्शकांमध्ये प्रीतम एस. के. पाटील यांचे नाव आज अग्रक्रमाने घेतले जाते. ‘अल्याड पल्याड’ चित्रपटाच्या दमदार यशानंतर आता ‘घबाडकुंड’ ला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादाने त्यांनी सलग दोन यशस्वी हॉररपट देत मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विदर्भातील यवतमाळसारख्या शहरातून आलेल्या प्रीतम पाटील यांनी आपल्या कल्पक दिग्दर्शनाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. शॉर्ट फिल्म्स, वेबसिरीज तसेच ‘खिचिक’, ‘डॉक्टर डॉक्टर’ आणि ‘ढिशक्यांव’ यांसारख्या चित्रपटांनंतर ‘अल्याड पल्याड’ आणि ‘घबाडकुंड’ या दोन सलग यशस्वी हॉररपटांनी त्यांच्या नावावर बॅक-टू-बॅक हिट्सची नोंद झाली आहे.

विशेष म्हणजे, ‘घबाडकुंड’ च्या माध्यमातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला पहिले सिनेमॅटिक युनिव्हर्स दिले. भय, रहस्य, अॅक्शन, इमोशन आणि थराराचा अनोखा मिलाफ असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा आणि समीक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने उल्लेखनीय यश मिळवले आहे. ‘घबाडकुंड’चे निर्माते डॉ. रसिक कदम (आयकॉन द स्टाईल) यांनी प्रीतम एस. के. पाटील यांच्या दिग्दर्शनावर पूर्ण विश्वास व्यक्त करत त्यांना सातत्याने पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या विश्वासामुळेच ‘घबाडकुंड’सारखा भव्य आणि तांत्रिकदृष्ट्या दर्जेदार चित्रपट साकार होऊ शकला.

आणखी वाचा – मुला-मुलींना लाठीने मारलं, ओढत नेलं; CJP आंदोलनादरम्यानच्या पोलिसांच्या कारवाईवर कलाकार संतप्त, म्हणाले…

याबाबत बोलताना प्रीतम एस. के. पाटील म्हणाले, ‘प्रेक्षकांनी ‘अल्याड पल्याड’ वर जसं प्रेम केलं, तसंच भरभरून प्रेम ‘घबाडकुंड’ला ही मिळत आहे, हा प्रतिसाद अधिक जबाबदारी वाढवणारा आहे. मराठीमध्ये उत्तम दर्जाचा हॉरर अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न पुढेही सुरू राहील. प्रेक्षकांच्या विश्वासामुळेच आम्ही आणखी मोठ्या कथा आणि सिनेमॅटिक युनिव्हर्स विस्तारण्याचं धाडस करू शकतो.

आणखी वाचा – पावसाळ्यात सर्वाधिक पसरणारे ७ आजार कोणते? त्यांना टाळण्याचे सोपे मार्ग…

विदर्भाचा चेहरा म्हणून उदयास आलेले प्रीतम एस. के. पाटील आज बॅक-टू-बॅक सुपरहिट चित्रपटांच्या जोरावर आपले पाय भक्कमपणे रोवत आहेत. मराठी हॉररला नवी दिशा देणाऱ्या या युवा दिग्दर्शकाकडून आता प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिकच वाढल्या आहेत.

Tags: entertainmentMarathi Film Directorpritam patil
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

kaylee hottle died
Entertainment

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

जुलै 22, 2026 | 11:00 am
Naseeruddin Shah On CJP Protest
Entertainment

चेहऱ्यावर मास्क आणि हातात काठ्या; विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात बॉलिवूड अभिनेता भडकला, म्हणाला, “गुंडांच्या हातून…”

जुलै 22, 2026 | 10:13 am
Savalyachi Janu Savali Team
Entertainment

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेची टीम वारीत दंग, पारंपरिक वेशभूषेत पोहोचले विठूरायाच्या दर्शनाला

जुलै 21, 2026 | 12:39 pm
Marathi Film Director
Entertainment

विदर्भाचा युवा दिग्दर्शक ठरतोय मराठी हॉररचा नवा चेहरा, ‘घबाडकुंड’च्या दिग्दर्शनाने जिंकली मनं

जुलै 21, 2026 | 11:20 am
Next Post
Savalyachi Janu Savali Team

'सावळ्याची जणू सावली' मालिकेची टीम वारीत दंग, पारंपरिक वेशभूषेत पोहोचले विठूरायाच्या दर्शनाला

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.