सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘सत्यशोधक’ चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित, सुप्रसिद्ध अभिनेते साकारणार महात्मा ज्योतिराव फुलेंची भूमिका

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
नोव्हेंबर 1, 2023 | 7:16 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satyashodhak movie first look out

'सत्यशोधक' चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित, सुप्रसिद्ध अभिनेते साकारणार महात्मा ज्योतिराव फुलेंची भूमिका

मराठी कलाविश्वात गेल्या काही वर्षांपासून थोर समाजसेवक व महापुरुषांवर आधारित अनेक चित्रपट, मालिका प्रेक्षकांसमोर येत आहे. त्यामध्ये आता एका चित्रपटाचा समावेश होत आहे. ‘समाजातील प्रत्येक स्त्री सुशिक्षित झालीच पाहिजे’ असा आग्रह ज्यांनी केला ते महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला त्या सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित एक नवा चित्रपट येत आहे. ‘सत्यशोधक’ असं या चित्रपटाचं नाव असून ज्याचं दिग्दर्शन निलेश जळमकर यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचं टीझर प्रदर्शित झालं होतं. आता चित्रपटाचं फर्स्ट लुक पोस्टर समोर आलं आहे. ज्यामध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेता संदीप कुलकर्णी महात्मा ज्योतिराव फुले यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. (Satyashodhak movie first look out)

समाजाचा प्रचंड विरोध असतानाही स्त्रियांच्या शिक्षणासाठी जे शेवटपर्यंत झटले, त्या महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचा जीवन प्रवास आता मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी चित्रपटाचं टीझर प्रदर्शित केलं, तेव्हा यात महात्मा ज्योतिराव फुलेंचा चेहरा दाखवण्यात आला नव्हता. त्यामुळे महात्मा फुले यांची भूमिका कोण साकारणार? याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता या चित्रपटातील मध्यवर्ती भूमिकेचा फर्स्ट लुक समोर आला. अभिनेता संदीप कुलकर्णी महात्मा ज्योतिराव फुलेंची भूमिका साकारताना दिसणार आहे.

हे देखील वाचा – ओंकार भोजनेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्यानंतरही त्याची ‘ती’ गोष्ट विसरु शकले नाहीत दिग्दर्शक-निर्माते, म्हणाले, “त्यावेळी मानधन वाढवलं असताना…”

चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित केला. ज्यामध्ये संदीप कुलकर्णी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या रूपात अगदी हुबेहूब दिसतात. त्यांना पाहून समोर साक्षात ज्योतिरावचं उभे आहेत का, असा भास होतो. “गुलामगिरीच्या अंधारात जेव्हा अन्यायाचा अतिरेक होत होता, तेव्हा झाला होता उदय एका थोर क्रांतिसूर्याचा. ‘सत्यशोधक’ ५ जानेवारीला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात आम्ही घेऊन येत आहोत.”, असं या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

हे देखील वाचा – सोनाली कुलकर्णी यांचे आई-वडील मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार, फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

View this post on Instagram

A post shared by Satyashodhak Film (@satyashodhakfilm)

या चित्रपटात संदीप यांच्यासह अभिनेत्री राजश्री देशपांडे, गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रवींद्र मनकनी व अन्य कलाकार झळकणार आहेत. निलेश जळमकर लिखित-दिग्दर्शित हा चित्रपट नवीन वर्षी ५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Tags: sandeep kulkarniSandeep Kulkarni's Satyashodhak movie first look outsatyashodhak movieupcoming marathi movie
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Shraddha Kapoor checking on pap after his camera lens fell

Video : पापाराझी छायाचित्रकाराच्या कॅमेऱ्याची लेन्स पडल्यावर श्रद्धा कपूरने काय केलं पाहा, व्हिडीओ पाहून तुम्हीही कराल कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.