शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

उन्हाळ्यात त्वचेची अशी घ्या काळजी, तितीक्षा तावडेनेच सांगितल्या खास टिप्स, अभिनेत्रीसारखंच दिसाल सुंदर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 7, 2024 | 8:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Titeeksha Tawde Gives Skin Tips

उन्हाळ्यात त्वचेची अशी घ्या काळजी, तितीक्षा तावडेनेच सांगितल्या खास टिप्स, अभिनेत्रीसारखंच दिसाल सुंदर

मे महिना सुरु झाला आहे आणि यंदाचा उन्हाळा असह्य झाला असल्याचं पाहायला मिळतं. उन्हाच्या झाल्या न सोसवणाऱ्या आहेत. त्यामुळे बऱ्याच जणांच्या तब्येतीवर परिणाम होताना पाहायला मिळत आहे. बरेचदा डोकेदुखी, डिहायड्रेशन, पित्त यांसारखे आजार होताना दिसत आहेत. अर्थात या सगळ्यात त्वचेचेही हाल होताना दिसत आहेत. उन्हामुळे त्वचा टॅन होणं ही तक्रार हमखास केली जाते. यावर अनेकजण घरगुती उपाय वा तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेताना दिसतात. दरम्यान अनेक कलाकारांच्या तेजस्वी, मुलायम त्वचेचं रहस्य नेमकं काय असा प्रश्न पडतो. अशातच एका लोकप्रिय अभिनेत्रीने तिच्या प्रेक्षकांसाठी उन्हाळ्यात त्वचेची काली कशी घ्यायची याबाबत सांगितलं आहे. (Titeeksha Tawde Gives Skin Tips)

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून अभिनेत्री तितीक्षा तावडे घराघरांत पोहोचली. या मालिकेतील नेत्रा या भूमिकेमुळे तितीक्षाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री अभिनेता सिद्धार्थ बोडकेसह लग्नबंधनात अडकली. तितीक्षाच्या सुंदर, मुलायम, चकाकणाऱ्या त्वचेचं रहस्य नेमकं काय आहे, या त्वचेची ती कशी काळजी घेते, इतरांनीही कशी काळजी घ्यायला हवी याबाबत तिने तिच्या युट्युब चॅनेलवरुन व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे.

आणखी वाचा – अधिपतीला गाणं शिकवणाऱ्या मास्तरीणबाईने रागाने सोडलं घर, अक्षराचा संशय ठरलं कारण, चारुहासने सूनेलाच दिला दोष, भुवनेश्वरीकडून नवी चाल

त्वचा ताजी, टवटवीत आणि चकाकणारी ठेवण्यासाठी खास टिप्स

View this post on Instagram

A post shared by Titeekshaa Tawde (@titeekshaatawde)

चांगल्या त्वचेची पहिली स्टेप ही आहे की प्रत्येकाने आपल्या त्वचेला नाव न ठेवता, आपल्या त्वचेबद्दल सकारात्मक बोलणं.

दररोज न चुकता फेसवॉश करणे. आणि फेसवॉश केल्यानंतर टोनरने आपला चेहरा पुसून घ्यायचा. यामुळे चेहऱ्याला चमक येते आणि खूप फ्रेश वाटतं. शक्यता उन्हाळ्यात ही प्रक्रिया दररोज करावी.

मेकअप काढल्यानंतर बरेचदा चेहरा लाल होतो. चेहरा खरखरीत होतो यावेळी तुम्हीच शक्यतो तुमच्या त्वचेला सूट होईल असं सिरम वापरु शकता. शक्यतो कोरफडयुक्त असे सिरम तुम्ही वापरा. यामुळे लाल रॅशेस दिसणं बंद होतं.

आणखी वाचा – शेखर राजाध्यक्ष नेत्रा नव्हे तर रुपालीच्याच बाजूने असल्याचं समोर, देवीआईच्या लेकींना हे सत्य कधी समजणार?, बळी गेल्यानंतर काय घडणार?

उन्हाळ्यात त्वचा खूप तेलकट असते त्यामुळे मॉइश्चरायजर लावायचं नसत असं वाटायचं. पण हे पूर्णतः चुकीचं आहे. त्यामुळे प्रत्येकाने न चुकता मॉइश्चरायजर लावणं चांगल्या त्वचेसाठी वापरावं.

उन्हाळा सुरु असल्याने त्वचा टॅन होणं हे होतंच यासाठी प्रत्येकाने सनस्क्रीन वापरणं खूप आवश्यक आहे.

Tags: marathi actressTiteeksha TawadeTiteeksha Tawade And Siddharth BodkeTiteeksha Tawde Gives Skin Tips
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
virat kohli and rahul vaidya fight
Entertainment

विराट कोहलीला डिवचनं राहुल वैद्यला पडलं महागात, क्रिकेटरच्या भावाने सुनावलं, म्हणाला, “मूर्ख, फॉलोवर्स वाढवण्यासाठी…”

मे 9, 2025 | 12:30 pm
soldier duty over marriage
Social

हळद फिटली नसतानाही जवान लग्नाच्या तिसऱ्या दिवशी कामावर रुजू, आई-वडील भावुक तर पत्नीचा खंबीर पाठिंबा, मन हेलावणारा व्हिडीओ

मे 9, 2025 | 11:22 am
Akshay Kelkar Haldi Ceremony
Entertainment

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली हळद, घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन, मराठी कलाकारांची हजेरी

मे 9, 2025 | 10:56 am
Next Post
Paaru Serial Update

पारूने हरिशबरोबर लग्नाला दिला नकार, अहिल्यादेवींचा शब्द मोडणार का?, तर दिशाने भरले दामिनीचे कान

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.