‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेला प्रेक्षक भरभरून प्रेम देताना दिसत आहेत. मालिकेच्या कथानकात येणाऱ्या रंजक वळणामुळे ही मालिका साऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. या मालिकेतील अक्षरा व अधिपती यांना तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. सध्या मालिकेत अक्षरा व अधिपती यांच्यातील प्रेम फुलताना दिसत आहे. अशातच मालिकेत अक्षरा व अधिपती यांच्या प्रेमात आता विरजण टाकायला एका पात्राची एन्ट्री झालेली पाहायला मिळत आहे. भुवनेश्वरीने नवी चाल आखत अक्षरा व अधिपतीच्या संसारात मिठाचा खडा टाकत असते. (Tula Shikvin Changlach Dhada Serial Update)
अधिपतीला गायन शिकायचं असतं. तेव्हा चारुहास व अक्षरा भुवनेश्वरीकडे जाऊन तिची परवानगी घेतात. भुवनेश्वरी अधिपतीला गायन शिकण्याची परवानगी देते. मात्र ती स्वतःच अधिपतील गाणं शिकवण्यासाठी शिक्षिका आणते. एकदम ग्लॅमरस अशा शिक्षिकेला ती अधिपतीला गाणं शिकवायला घेऊन येते. अक्षराला अगदी पाहिल्या दिवसापासून ती पटत नाही. तर भुवनेश्वरी डाव आखत त्या सरगम मॅडमला अधिपतीच्या आयुष्यात स्थान मिळवण्यास सांगतात.
मालिकेत असं पाहायला मिळत की, सरगम मॅडम व अधिपती गप्पा मारत असतात तेव्हा अक्षरा तेथे येते आणि सांगते की , “अजून तुम्ही गाणं शिकवायला सुरुवातही नाही केली. बाहेर जाऊन गप्पा मारण्यापेक्षा तुम्ही गाणं शिकवायला सुरुवात करा. मी देखील एक शिक्षिका आहे. मी असं शिकवणी सोडून विद्यार्थ्यांशी गप्पा मारत बसत नाही”. यावर त्या सरगम मॅडम उत्तर देत म्हणतात की, “तुमची आणि माझी शिकवण्याची पद्धत वेगळी आहे. मला शिकवायला सुरुवात तर केली आहे. हा गोंधळ सुरु असताना तिथे भुवनेश्वरी येतात आणि त्या अक्षराला सांगतात की, तुम्ही यांत ढवळाढवळ करू नका”.
त्यानंतर झाला प्रकार पाहून सरगम मॅडम घर सोडून जातात. तेव्हा चारुहास अक्षराची समजूत काढताना दिसतात. ते म्हणतात की, “आता अधिपतीचा गायनाचा योग आला आहे तर तू पजेसिव्ह होऊ नकोस. तू त्याला गायन शिकू दे. त्या मॅडम त्यांचं काम करतील”.