मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बाळाचं प्लॅनिंग कधी करणार?”, चाहत्याने प्रेग्नंसीबाबत तितीक्षा तावडेला विचारला प्रश्न, अभिनेत्री म्हणाली, “अजून आम्ही…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 19, 2024 | 5:38 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Titeeksha Tawde On Baby Planning

"बाळाचं प्लॅनिंग कधी करणार?", चाहत्याने प्रेग्नंसीबाबत तितीक्षा तावडेला विचारला प्रश्न, अभिनेत्री म्हणाली, "अजून आम्ही…"

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून अभिनेत्री तितीक्षा तावडे घराघरांत पोहोचली आहे. तितीक्षाने आजवर तिच्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेत तितीक्षा नेत्रा ही भूमिका साकारत आहे. तिच्या नेत्रा या पात्राला प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळताना पाहायला मिळत आहे. मालिकेमुळे नेहमीच चर्चेत असणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरही सक्रिय असते. नेहमीच ती सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते. (Titeeksha Tawde On Baby Planning)

अशातच तितीक्षाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन चाहत्यांशी प्रश्नोत्तरांचा एक सेगमेंट घेतला. तितीक्षाने या सेगमेंटमध्ये विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे तिच्या युट्युब चॅनेलच्या व्हिडिओमधून दिली आहे. यावेळी तिने चाहत्यांच्या अनेक प्रश्नाची उत्तरे दिली आहेत. यापूर्वी तितीक्षाने अनेकदा चाहत्यांसह संवाद साधला आहे. सोशल मीडियावर सक्रिय असल्याने नेहमीच ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच एका चाहतीने बेबी प्लॅनिंगबद्दल तिला प्रश्न विचारला आहे.

आणखी वाचा – ‘आयुष्यावर बोलू काही’च्या कार्यक्रमासाठी पोहोचले समीर चौघुले व ‘तारक मेहता…’मधील भिडे, सलील कुलकर्णी म्हणाले, “हे दोघेही…”

View this post on Instagram

A post shared by Titeekshaa Tawde (@titeekshaatawde)

तितीक्षाला एका चाहतीने प्रश्न विचारला आहे की, “बेबी प्लॅन कधी करणार आहेस?”, असं म्हटलं आहे. यावर उत्तर देत तितीक्षा म्हणाली, “आताच लग्न झालं आहे. अवघे चार महिने लग्नाला झाले आहेत. आता लगेच इतक्यात बेबी प्लॅन कुठे करणार. पण अजून वेळ आहे. अजून आम्ही या गोष्टीवर काहीच विचार केला नाही आहे. नंतर बघू”, असं म्हटलं आहे. एकूणच नुकतंच लग्न झालं असून बेबी प्लॅनिंगचा विचार सिद्धार्थ व तितीक्षाने केला नसल्याचं समोर आलं आहे.

आणखी वाचा – पारूनेही केली आदित्यसाठी वडाची पूजा, सावित्रीसमोर आलं मंगळसूत्राचं सत्य, अहिल्यादेवी तिचा सून म्हणून कधी स्वीकार करतील का?

तितीक्षा तावडेने २६ फेब्रुवारी रोजी अभिनेता सिद्धार्थ बोडकेसह लग्नगाठ बांधली. तितीक्षा व सिद्धार्थच्या लग्नाची बरीच चर्चा सोशल मीडियावर रंगलेली पाहायला मिळाली. अगदी थाटमाट आणि शाही पद्धतीने या दोघांची विवाहसोहळा संपन्न झाला. अगदी जवळचे नातेवाईक, कलाकार मंडळींच्या उपस्थितीत तितीक्षा व सिद्धार्थने लग्न केले. लग्नानंतरही ही जोडी बरेचदा चर्चेत असलेली पाहायला मिळते. दोघेही त्यांच्या युट्युब चॅनेलवरुन व्हिडीओ शेअर करत संपर्कात राहत असतात.

Tags: entertainmentmarathi actresstiteeksha tawdeTiteeksha Tawde and Siddharth BodakeTiteeksha Tawde On Baby Planning
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Bollywood actress Dalljiet Kaur accused Nikhil Patel of using her name for a fame and seeking publicity know more

घटस्फोटानंतर केलं दुसरं लग्न, वर्षभरातच सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे नवऱ्यावर गंभीर आरोप, म्हणाली, “त्याने फक्त प्रसिद्धीसाठी...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.