मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत एका अभिनेत्रीचं नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या सौंदर्याचेही लाखो चाहते दिवाने आहेत. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या लोकप्रिय मालिकेतून ऐश्वर्या घराघरांत पोहोचल्या. नकारात्मक पात्र साकारत त्या प्रेक्षकांच्या मनात घर करत आहेत. सोशल मीडियावरही त्या नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अनेक रील व्हिडीओ त्या शेअर करताना दिसतात. (Aishwarya Narkar On Trolling)
अशातच ऐश्वर्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका रील व्हिडीओने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. या व्हिडीओमध्ये त्या भरजरी अशा पैठणी साडीमध्ये मराठमोळ्या लूकमध्ये दिसत आहेत. त्यांचा हा मराठमोळा लूक अनेकांच्या पसंतीस पडलेला दिसत आहेत. यावेळी ऐश्वर्या यांनी या मराठमोळ्या लूकमध्ये मराठमोळ्या गाण्यावर ठेका धरलेला पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर कमेंट करत अनेक चाहत्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. तर काहींनी या व्हिडीओवरही कमेंट करत त्यांना ट्रोल करायचा प्रयत्न केला आहे.
ऐश्वर्या यांना या व्हिडीओवर ट्रोल करताच त्यांनी त्या नेटकऱ्याची चांगलीच कानउघडणी केली आहे. त्यांच्या या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने कमेंट करत, “आणि आता तोंडावर लाली पावडर केली नाही तर भयानक नाही का”, असं म्हणत त्यांना डिवचलं आहे. नेटकऱ्याची ही कमेंट स्टोरीमध्ये पोस्ट करत ऐश्वर्या यांनी त्याला चांगलीच समज दिली आहे. “ज्याला आपण प्रत्यक्ष भेटलो नाही त्यांच्या बाबतीत उपटसुंभासारखे विधान करण्याची हुशारी”, असं म्हणत त्याची कानउघडणी केली आहे.

ट्रेंडिंग रीलवरुन बरेचदा ऐश्वर्या नारकर यांना ट्रोलही केलं गेलं आहे. दरम्यान त्यांनी या ट्रोलिंगवर वेळोवेळी उत्तर दिलेलं पाहायला मिळालं. ऐश्वर्या ट्रोलर्सला न जुमानता नेहमीच त्यांना उत्तर देताना दिसतात. ऐश्वर्या नारकर सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या त्यांचे पती अविनाश नारकर यांच्या बरोबरचेही अनेक व्हिडीओ शेअर करत लक्ष वेधून घेत असतात.