‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात असे पाहायला मिळत आहे की, यंदाच्या पर्वात कोणतीच गोष्ट स्पर्धकांना फुकट मिळणार नसून प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागणार आहे आणि हा प्रवास ‘बिग बॉस’च्या घरात येण्या दिवसापासूनच सुरु झालेला पाहायला मिळत आहे. अगदीच ‘बिग बॉस’ने स्पर्धकांना बेडवर झोपण्यासही मनाई केलेली पाहायला मिळत आहे त्यामुळे स्पर्धक आता जमिनीवर झोपताना दिसले. हा सगळा प्रवास स्पर्धकांचा सुरु असतानाच ‘बिग बॉस’ने घरातील ३ निर्णय न घेऊ शकणाऱ्या लोकांना नॉमिनेट करण्यास सांगितले होते.स्पर्धकांनी नॉमिनेट केल्यानंतर धनंजय, सुरज, इरिना यांची नावे पुढे आली. अशातच ‘बिग बॉस’ने या ३ स्पर्धकांना निर्णय घेण्यास सांगितले हे पाहून सर्व स्पर्धकांची फजिती झाली. (Bigg Boss Marathi 5 Updates)
नॉमिनेट केलेल्या सर्व स्पर्धकांची फजिती झाली आणि धनंजय, सुरज, इरिना यांना बिग बॉस करेन्सीद्वारे सामान खरेदी करण्याची परवानगी ‘बिग बॉस’ने दिली. घरातील सर्व सदस्यांसाठी काय सामान योग्य आहे याचा निर्णय घेण्याची या तिघांवर जबाबदारी येऊन पडली. त्यानंतर हे तिघेही जेव्हा बिग बॉस करन्सी घेऊन ‘बिग बॉस हब’मध्ये सामान खरेदी करण्यासाठी जातात तेव्हा सर्व स्पर्धक त्यांच्याशी गोड बोलू लागतात. मात्र ‘बिग बॉस’ या तिघांना जाणीव करुन देतात की, यात सर्व स्पर्धकांनी तुम्हालाच नॉमिनेट केलं होतं आणि आता तुमच्याकडे पावर आल्यावर ते तुमच्याशी गोड बोलू लागलेत.
आरसा दाखवणे हे माझं कामच आहे त्यामुळे तुम्ही माणसं ओळखायला शिका हे ऐकून सगळे स्पर्धक एकमेकांकडे पाहत हसू लागतात. तर घरात बिग बॉस करन्सी घेऊन आत मध्ये गेल्यावर धनंजय सामान व रकमेच्या बोर्ड कडे जातो आणि वाचू लागतो. त्यावेळेला घरातील इतर स्पर्धक यावरही चर्चा करु लागतात. योगिता म्हणते की, “इरिनाला वाचता येत नाही”. तर जान्हवी म्हणते की, “इरिनाला वाचता येत नाही आणि सूरज कोणताच निर्णय घेऊ शकत नाही”. तर अरबाज असंही म्हणतो की, “सूरजलाही वाचता येत नाही”. त्याचं वेळेला पॅडी असेही म्हणतो की, “आपण निवडलेली लोक ही चुकीची आहेत हे आपल्याला कळायला हवं”.
एकूणच ‘बिग बॉस’च्या पर्वात सूरजला टार्गेट केलं जात असल्याचे पाहायला मिळत आहे. गावाकडून आलेला शिक्षण नसलेला पण समाज माध्यमांवर लोकप्रियता मिळवलेला हा सूरज आहे. सूरजला वाचता येत नाही तो निर्णय घेऊ शकत नाही असे इतर स्पर्धकांचे मत बनलेलं आहे आणि त्याबाबत ते चर्चाही करताना दिसतात. आता सूरज यांना हा खेळ कशाप्रकारे खेळून दाखवणार, सूरजला इतर स्पर्धक टार्गेट करणार का हे सारं पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.