छोट्या पडद्यावरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका सध्या चांगलीच गाजत आहे. याच लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री म्हणजे तितीक्षा तावडे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. तितीक्षाने आजवर अनेक लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात आपलं घर केलं आहे. याचसह मोठ्या पडद्यावरही सक्षम भूमिका साकारत तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. अभिनय क्षेत्रासह तितीक्षाही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.
या मालिकेत सध्या नेत्राच्या गारोदरपणाचे कथानक सुरु आहे. नेत्रा गरोदर असून तिच्या गरोदरपणाची बातमी विरोचकापर्यंत पोहोचू नये. यासाठी राजाध्यक्ष कुटुंबातील प्रत्येकजण संघर्ष करताना दिसत आहे. प्रत्येक जण नेत्राच्या गरोदरपणाची खबर विरोचकापर्यंत पोचू नये यासाठी प्रयत्न करत आहे, मालिकेतील हेच कथानक प्रेक्षकांना आवडत असून यातील नेत्राच्या खंबीर व सक्षम भूमिकेबद्दल सर्वांनाच हेवा वाटत आहे. एखाद्या गोष्टीतील पात्राप्रमाणे नेत्राची भूमिका असून भविष्यात तितीक्षाने नेत्रा या भूमिकेची गोष्ट तिच्या बाळांना सांगेल असं म्हटलं आहे.
तितीक्षा तावडेने नुकतीच ‘इट्स मज्जा’बरोबर खास बातचीत केली. यादरम्यान, तितीक्षाने असं म्हटलं की, “लेखकांनी मालिकेत ज्या पद्धतीने नेत्राची प्रेग्नन्सी आणली हे मला खूपच रंजक वाटत आहे. नेत्रा गरोदर असल्यामुळे तिच्या हातून विरोचकाचा वध न होणे हे लेखकांनी फारच रंजक पद्धतीने आणलं आहे. नेत्रा हे पात्रदेखील तितकेच रंजक आहे. त्यामुळे मला कदाचित बाळं झाली तर मी नेत्राची गोष्ट त्यांना सांगू शकते, एखाद्या आटपाट नगरातील गोष्ट असल्यासारखीच या मालिकेची कथा मजेदार आहे”.
आणखी वाचा – “दिवसाला ६० सिगारेट आणि दारु…”, व्यसनाच्या आहारी गेलेले नाना पाटेकर, म्हणाले, “वासामुळे माझ्या गाडीत…”
यापुढे तिने असं म्हटलं की, “मालिकेतील सध्याचे कथानक हे खूपच अनपेक्षित आहे. कन्नड भाषेतील एका मालिकेवरुन ही मालिका प्रेरित आहे. त्या मालिकेत पहिल्या-दुसऱ्या महिन्यातच मुख्य अभिनेत्री गरोदर होती, पण या मालिकेत तसं नाही. या मालिकेच्या लेखकांनी पहिले दीड वर्ष ही मालिका खूपच गुंतवून ठेवली आहे”.