‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. या मालिकेमुळे अभिनेत्री दिशा वकानी घराघरात पोहोचली. दिशाच्या दयाबेन या पात्राने अशी काही जादू केली की सगळेच तिचे चाहते झाले. मात्र, दिशा गेल्या सात वर्षांपासून शोमधून गायब होती. आणि त्याची उणीव आजही जाणवते. अजूनही दयाबेन म्हणजेच दिशा मालिकेत पुनरागमन करेल अशी आशा लोकांना आहे. मात्र मालिकेत दिशाला पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता काही कमी झालेली नाही. (Dayaben Aka Disha Vakani Income)
दिशा वकानीने आपल्या करिअरची सुरुवात रंगभूमीपासून केली होती. ‘कोइमोई’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या पहिल्या पगाराबद्दल सांगितले होते. एका नाटकासाठी तिला अडीचशे रुपये मिळाले. मिळालेलं मानधन दिशाने तिचे वडील भीम वकानी यांना दिले होते. दिशाचे वडीलही गुजरातचे प्रसिद्ध नाट्य कलाकार होते. दिशा वकानीने सांगितले की, पहिला पगार पाहून तिचे वडील खूप भावूक झाले. आणि तो क्षण नेहमीच अभिनेत्रीच्या हृदयाच्या जवळ असेल. याबाबत बोलताना ती म्हणाली, “मला पहिल्या नाटकाचे २५० रुपये मिळाले होते. मला आठवते की मी ते पैसे घेतले आणि माझ्या वडिलांना दिले. एक कलाकार म्हणून पैशापेक्षा कामाचे समाधान महत्त्वाचे असते”.
दिशा वकानीने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारली. या मालिकेत तिच्या पात्रासाठी तिला ४९,९०० टक्के वाढ मिळाली. दिशा वकानीला दयाबेनच्या पात्रासाठी प्रति एपिसोड १.२५ लाख रुपये मिळत होते. दिशा वकानी ही शोमधील तिसरी अभिनेत्री होती जिला सर्वाधिक पैसे मिळाले. दिलीप जोशी पहिल्या क्रमांकावर तर शैलेश लोढा दुसऱ्या क्रमांकावर होते.
दिशा वकानीने दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर प्रसूती रजा घेतली होती. काही महिन्यांनीच ती परत येईल असे वाटले होते. मात्र तसे झाले नाही. दिशाने तिच्या मुलाच्या संगोपनासाठी मालिकेत न परतण्याचा निर्णय घेतला. दिशा वकानीने नोव्हेंबर २०१५ मध्ये पेशाने व्यावसायिक असणाऱ्या मयूर पडियाबरोबर लग्न केले. तिने २०१७ मध्ये एका मुलीला जन्म दिला आणि २०२२ मध्ये एका मुलाची आई झाली.