‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत आता रुपालीला नेत्राच्या गरोदरपणाबद्दल माहिती झाली असून रूपाली तिच्या बाळाला जीवे मारण्याचे पूर्ण प्रयत्न करताना दिसत आहे. नेत्रालाही रुपालीला तिच्या बाळाबद्दल कळले असल्याचे वाटत आहे आणि हीच गोष्ट ती अद्वैतला सांगते. मात्र अद्वैत नेत्राला या सगळ्याचे तिने टेन्शन घेऊ नये असा धीर देतो. दरम्यान, अद्वैतच्या नेत्राला आत्मविश्वास देण्याबद्दल इंद्राणीही अद्वैतचे कौतुक करते. तसेच नेत्राचे बाळ हे देवीआईचाच एक अंश असल्याचे ती अद्वैतला सांगते.
पुढे रुपाली नेत्राच्या बाळाबद्दल आणखी खात्री करून घेण्यासाठी तिच्या खोलीत येते. तेव्हा तिला नेत्राच्या बेडवर काही औषधे दिसतात. मात्र ती औषधे रुपालीपासून हिसकावून घेते. इतक्यात अद्वैत खोलीत येतो आणि रुपालीला नेत्राबरोबर बोलताना बघून वैतागतो. तिला खोलीबाहेर जायला सांगतो. इतक्यात रुपाली त्या दोघांकडे बघत त्यांच्याकडे नातवंडाची मागणी करते. यामुळे नेत्रा-अद्वैतला तिचा आणखी संशय येतो.
आणखी वाचा – ना अवाढव्य खर्च, ना महागडे कपडे; सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांचा विवाहसोहळा संपन्न, पहिला फोटो समोर
त्यानंतर रुपाली अस्तिकट्यार मिळावी अशी इच्छा मनातल्या मनात व्यक्त करते.इतक्यात केतकी काकू आणि तन्मय बाहेर जायला निघतात. त्यांच्या बाहेर जाण्याच्या संधीचा फायदा घेत रुपाली आपल्या प्रतिबिंब शक्तीन केतकी काकूचे प्रतिबिंब तयार करते आणि तिला नेत्राकडून सर्व माहिती काढायला सांगते. रुपालीच्या म्हणण्यानुसार केतकी काकूचे प्रतिबिंब नेत्राच्या खोलीत जाते आणि तिच्याकडून अस्तिकट्यारबद्दलची सगळी माहिती घेते.
आणखी वाचा – सोमवारी मिथुन राशीसह ‘या’ राशीच्या लोकांची होईल इच्छित प्रगती, आर्थिक फायदाही होणार, जाणून घ्या…
तेव्हा नेत्रा केतकी काकूच्या प्रतिबिंबाला अस्तिकट्यारबद्दल सगळी माहिती देताना असं म्हणते की, “मी विरोचकाचा वध केला तेव्हा माझ्या पोटात बाळ असल्यामुळे अस्तिकट्यार जागृत नव्हती आणि त्यामुळेच विरोचकाचा वध झाला नाही. तसेच आता पोटात बाळ असल्याने अजून ७ महिने विरोचकाला काहीच करता येणार नसल्याचे सांगते. इतक्यात तिथे फाल्गुनी येते. त्यामुळे केतकी काकूचे प्रतिबिंब तिथून निघते आणि नेत्राने सांगितलेली प्रत्येक गोष्ट रुपालीला येऊन सांगते. अशातच आता पुढील भागात रुपालीच्या प्रतिबिंब शक्तीबद्दल शेखरला माहिती होणार आहे.