शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रुपालीसह नेत्रालाही ऐकू आली ‘विचित्र वीणा’, हा देवीआईचा शुभसंकेत असेल की आणखी काही?, विरोचक सावध

Saurabh Moreby Saurabh More
जून 16, 2024 | 9:43 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi marathi serial update Netra Gets Worried as She Hears the 'Vichitra Veena'

रुपालीसह नेत्रालाही ऐकू आली ‘विचित्र वीणा’, हा देवीआईचा शुभसंकेत असेल की आणखी काही?, विरोचक सावध

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या कालच्या भागात रुपाली बाहेर जाऊन काहीतरी कटकारस्थान करत असल्याचा संशय नेत्रा व इंद्राणी यांना आला असल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर राजाध्यक्ष कुटुंबीयांनी रुपालीविरुध्द केलेल्या प्लॅननुसार केतकी काकू रुपालीबरोबर चांगल्या वागत असल्याचे पाहायला मिळाले. अशातच आजच्या भागात रूपालीला अस्तिकट्यार गायब कशी झाली? याबद्दल प्रश्न पडत आहे.

नेत्रा व इंद्राणी घरी असतानादेखील अस्तिकट्यार गायब झाली. मग ती कुणी गायब केली? किंवा कुठे गेली? असा विचार करत असतानाच केतकी काकू येऊन तिला राजाध्यक्ष कुटुंबीयांना मनवण्यासाथी तिने काही विचार केला आहे का? याबद्दल विचारते. तसेच केतकी काकू तिला चांगले वागण्याचे देखील सांगते. मग पुढे नेत्राला श्लोकाप्रमाणे त्या अस्तिकट्यारीने मारता येणार नाही. तसेच त्या अस्तिकट्यारचा आता काही उपयोग नाही असं वाटतं असतं. मात्र अद्वैत तिची समजून काढतो आणि तिला उगाच टेंशन न घेण्याविषयी सांगतो.

इतक्यात केतकी काकू येते आणि रुपालीचा तिच्यावर विश्वास असल्याचे सांगते. फक्त तीचाच नाहीतर फाल्गुनी व तन्मयचादेखील रुपालीवर विश्वास असल्याचे ती नेत्रा-अद्वैतला सांगते. पुढे केतकी काकू नेत्राला मिठाई व लहान बाळांचे काही फोटोस देते. पुढे नेत्राला विचत्र वीणाची धून ऐकू येते. विरोचक विचित्र वीणा वाजवत असल्याचे नेत्राला वाटते. मात्र अद्वैतला ती धुन ऐकू येत नाही.

View this post on Instagram

A post shared by सातव्या मुलीची सातवी मुलगी (@saatvyamulichisaatvimulgioffic)

आणखी वाचा – स्वतःच्या लग्नात असा दिसत होता ‘तुला शिकवीन…’मधील अधिपती, साधेपणाने वेधलं लक्ष, पारंपरिक लूकलाच दिली होती पसंती

पुढे रुपाली पुन्हा एकदा अस्तिकट्यार गायब कशी झाली? याचा विचार करत असताना तिच्या खोलीत नेत्रा व अद्वैत येतात. अस्तिकट्यार कोण वाजवत आहे? हे बघण्यासाठी ते आलेले असतात. मात्र हेच रुपालीला कालू नये, यासाठी नेत्रा शेखरला तिचे पोट दुखत आहे का? म्हणून विचारते. तेव्हा रुपाली त्या दोघांना थांवण्यासाठी सांगते. तेव्हा अद्वैत रुपालीला तिच्यापासून लांब राहायला सांगतो.

आणखी वाचा – “अजिंक्य घरी बघत असेल माझी वाट”, शिवानी सुर्वेचा नवऱ्यासाठी हटके उखाणा, लाजत म्हणाली…

पुढे नेत्रा व अद्वैत शेखरची चौकशी करायला आल्याबद्दल विचार करत असतानाच तिलाही विचित्र वीणा ऐकू येते. नुसती ऐकुच येत नही तर तिला तिच्या खोलीत ती वीणा दिसतेदेखील. त्यामूळे ती वीणा बघताच रुपाली खुश होते. त्यामुळे आता मालिकेत नक्की काय होणार? नेत्रा व रुपाली यांना एकत्र वीणा ऐकू येणे, हा नक्की कसला संकेत आहे? हे आगामी भागात पाहायला मिळणार आहे.

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsSatvya mulichi satavi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Next Post
Prathamesh Parab shared an emotional post for his father on the occasion of Father's Day.

“ते अजूनही ऑफिसला सायकलने जातात”, ‘फादर्स डे’निमित्त प्रथमेश परबची वडिलांसाठी भावुक पोस्ट, म्हणाला, “जीवनशैली बदलली तरी...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.