झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या कालच्या भागात रुपाली अतिकट्यारचा नाश करण्यासाठी घराबाहेर पडून ते जाळण्याचा प्रयत्न करते. मात्र ती अस्तिकट्यार न जाळताच पुन्हा घरी येते. घरी येताच रुपाली नेत्रा व इंद्राणी यांना ती देवळात गेली असल्याचे सांगते. मात्र नेत्राला पेट्रोलच्या वासावरुन रुपालीचा संशय येतो. त्यामुळे इंद्राणी रुपालीवर लक्ष ठेवावे लागेल असं म्हणते. यानंतर रुपाली तिच्या खोलीत येऊन अस्तिकट्यार नेत्रा व इंद्राणी यांच्या हातात लागू न देण्याबद्दल मनातल्या मनात स्वतःशीच बोलते.
यानंतर राजाध्यक्ष कुटुंबीय त्यांच्या प्लॅननुसार केतकी काकूला विरोचकाच्या म्हणण्यानुसार वागायला सांगतात. सगळे स्वयंपाक घरात असताना विरोचक तिथे येतो आणि इतक्यात सगळे तिथून निघून जातात. मात्र केतकी काकू तिथे थांबून रुपालीला जेवायला सांगते. यावर रुपाली खुश होऊन तूच एकटी माझ्याबरोबर बोलत आहेस बाकी कुणी काही बोलत नाही असं म्हणते. यावर केतकीही तिच्या हो ला हो म्हणते. यावरून रुपालीला असं वाटतं की केतकी काकू तिच्या जाळ्यात फसली आहे. मात्र केतकी काकू रुपालीला राजाध्यक्ष कुटुंबियांनी बनवलेल्या प्लॅनमध्ये फसवत आहे.
आणखी वाचा – “बाळूमामांमुळेच कुटुंबावरील संकट टळलं”, बाळूमामा साकारणाऱ्या अभिनेत्याने सांगितला प्रसंग, आली प्रचिती
पुढे ठरलेल्या प्लॅन प्रमाणे केतकी काकू रुपालीच्या खोलीत जाऊन रुपालीच्या शरीरात असलेल्या विरोचकामुळे हे सगळं होत आहे. त्याने रुपाली कडून करवून घेतलेल्या कृत्यांमुळे घरातील सगळे जण रुपाली विरुद्ध असं वागत असल्याचे केतकी काकू रुपालीला सांगतात. तुझ्या शरीरात असलेल्या त्या राक्षसाने आपले सोन्याचसारखे घर तोडले असल्याचे केतकी काकू रुपालीला सांगतात. यादरम्यान रुपाली हे सगळं काही तिनेच केलं असल्याचे केतकी काकूसमोर नाटक करते. मात्र केतकी काकू हे सगळं तिने न करता तिच्या शरीरातील राक्षसाने केले असल्याचे तिला वारंवार सांगत असतात. पुढे केतकी काकू मला घरातील सर्वांची मनं जिंकायची असल्यचे म्हणते.
आणखी वाचा – कर्क, कन्या व कुंभ राशीच्या लोकांनी शुक्रवारी गुंतवणूक टाळावी, तुमचा दिवस कसा असेल? जाणून घ्या…
या सगळ्यात केतकी काकू रुपालीला मी तुझ्याबरोबर आहे. तू जे काही करशील त्यात मी तुला साथ देईन असा विश्वास देते. त्यामुळे आता केतकी काकूच्या मदतीने राजाध्यक्ष कुटुंबियांचा रुपालीविरुद्धचा प्लॅन यशस्वी होणार का? की राजाध्यक्षच कुटुंबीयच रुपालीच्या प्लॅमध्ये फसणार? हे पुढील मालिकेच्या पुढील भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.