शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आई झाल्यानंतर पहिल्यांदाच कार्तिकी गायकवाड कामावर रुजू, कार्यक्रमाला केली सुरुवात, आता दिसते अशी

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 16, 2024 | 4:03 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Kartiki Gaikwad first singing show after becoming a mother and shared special post

आई झाल्यानंतर कार्तिकी गायकवाडने कामाला केली सुरुवात, पहिल्या गायनसेवेनिमित्त शेअर केली खास पोस्ट

झी मराठी वहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प’ या कार्यक्रमातून अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झालेली गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड. या ‘सारेगमप’मुळे कार्तिकीला खूप लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमातील तिचं ‘घागर घेऊन’ हे गाणं चांगलंच व्हायरल झालं होतं. या कार्यक्रमाची विजेती गायिका कार्तिकी ही तिच्या आवाजाने कायमच चर्चेत असते. त्याचबरोबर ती सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व गाण्याचे व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या या फोटो व व्हिडीओला प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतो. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम कार्तिकी गायकवाडने काही महिन्यांपूर्वी गुडन्युज दिली. लग्नानंतर चार वर्षांनी कार्तिकीने मे महिन्यात एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी आपल्या बाळाची गुडन्यूज दिली आहे. (Kartiki Gaikwad Singing)

२०२० मध्ये कार्तिकीने रोनित पिसेशी लग्नगाठ बांधली. त्यानंतर लग्नाच्या चार वर्षांनी कार्तिकी आई झाली आहे. ‘Its Baby Boy’ गोंडस बाळाच्या आगमानाने मी खूपच आनंदी आहे. अशी पोस्ट लिहीत तिने आई झाल्याची बातमी आपल्या चहात्यांबरोबर शेअर केली होती. आई झाल्यानंतर कार्तिकी आता पुन्हा आपल्या कमावर रुजू झाली आहे. कार्तिकी सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक गायनाचे व्हिडीओ शेअर करत असते. नुकतीच तिने पुण्यातील एके ठिकाणी गायनसेवा केली असून याचे काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : इरिनाबरोबर मैत्रीपलीकडे होतं नातं?, वैभवने पहिल्यांदाच दिलं स्पष्टीकरण, म्हणाला, “आमच्या दोघांचा स्वभाव…”

कार्तिकीने पुण्यातील भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळातील गणपतीसाठी गायनसेवा केली. याचनिमित्ताने कार्तिकीने एक पोस्ट केली आहे. यात तिने असं म्हटलं आहे की, “हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती भाऊसाहेब रंगारी येथे गायनसेवा सादर करुन खूप दिवसांनी पुन्हा कार्यक्रमाला सुरुवात केली आहे” असं म्हटलं आहे. सारेगमप लिटल चॅम्प्स’च्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या कार्तिकी गायकवाडचा मोठा चाहतावर्ग आहे. कार्तिकीने आपल्या सुरांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “त्याने माझा वापर केला कारण…”, घराबाहेर आल्यानंतर वैभवचे अरबाजबाबत उघडले डोळे, म्हणाला, “मला जाणवलं…”

‘सारेगमप लिटल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वाची कार्तिकी गायकवाड विजेती ठरली होती. गरोदरपणात आणि त्यानंतर आई होताच गायिका काही काळ कार्यक्रम करत नव्हती. मात्र आताअ कार्तिकी पुन्हा एकदा तिच्याअ गायनसेवेसाठी रुजू झाली असून यानिमित्ताने तिने पोस्ट शेअर केली आहे. दरम्यान. या गायनसेवेला श्रोत्यांकडूनही तुफान प्रतिसाद मिळाल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे

Tags: kartiki gaikwadmarathi singerSaregamapa Little Champs Fame Kartiki Gaikwad
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 Celebs Live In Rented Houses
Entertainment

कोट्यवधी कमावतात तरीही कलाकार भाड्याच्या घरात का राहतात?, कारण ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या…

जून 6, 2025 | 1:30 pm
Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Next Post
Aarya Jadhao responded to Nikki mother

Bigg Boss Marathi : “आम्हीही इथे मार खायला आलो आहोत का?”, निक्कीच्या आईला आर्याने सुनावलं, म्हणाली, “काकू तुम्ही…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.