शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : मुग्धा वैशंपायनचं सासरकडचं घर आतून आहे असं, प्रवेश करताच दत्तगुरुंचं छोटं मंदिर, प्रसन्न वातावरण अन्…; व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
जून 28, 2024 | 1:38 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Saregamapa fame singer Mugdha Vaishampayan shared video of Dattaguru bhajan at home in Aravali

Video : मुग्धा वैशंपायनचं सासरकडचं घर आतून आहे असं, प्रवेश करताच दत्तगुरुंचं छोटं मंदिर, प्रसन्न वातावरण अन्…; व्हिडीओ व्हायरल

झी मराठी वाहिनवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या लोकप्रिय कार्यक्रमामधून आपल्या गोड आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी लोकप्रिय जोडी म्हणजे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे. मुग्धा व प्रथमेश हे दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते त्यांचे फोटो व गाण्याचे व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. मुग्धा व प्रथमेश त्यांच्या लग्न सोहळ्यामुळे विशेष चर्चेत आलेले पाहायला मिळाले. दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चाही रंगलेली पाहायला मिळाली. आपल्या गाण्याने चर्चेत राहणारी ही जोडी सोशल मीडियावरही तितकीच चर्चेत राहत असते. अशातच त्यांनी सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे.

मुग्धा-प्रथमेश यांना दत्तगुरुंचे वेड आहे. अनेकदा गावी गेल्यानंतर दोघे नित्यनियमाने गुरुवारचे भजन करतात. आरवलीमध्ये घरी दत्तगुरुंची ही भजनसेवा पार पडली जाते आणि या भजनसेवेमध्ये दोघेही अगदी तल्लीन होऊन भजनसेवा करतात. यावेळी प्रथमेश हा कधी तबलावादन करतो तर कधी टाळ वादनही करतो. तसेच अनेकदा तो भजन गातोदेखील. तर मुग्धाही गायनसेवा करत दत्तगुररुंच्या चरणी आपली सेवा अर्पण करते. याचे  काही खास क्षण हे दोघे त्यांच्या सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात.

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

आणखी वाचा – Video : लीला-एजेचा रोमँटिक अंदाज, लग्नाच्या रिसेप्शनमधील दोघांच्या लूकने वेधलं लक्ष, मोठ्या मंगळसूत्राने वेधलं अधिक लक्ष

अशातच मुग्धाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. ‘गुरुवार भजन’ असं म्हणत मुग्धाने हा खास व्हिडीओ शेअर केला आहे. दत्तगुरुंचे भजन झाल्यानंतर घरातली मंडळी प्रार्थना करत आहेत. यावेळी प्रथमेशही माइक घेऊन प्रार्थना करत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये प्रथमेशच्या घरी दत्तगुरुंची मोठी प्रतिमा दिसत आहे. या व्हिडीओमधून त्यांच्या घराची झलकई पाहायला मिळत आहे.  तसेच घरच्या नित्य गुरुवार भजन सेवानिमित्त त्यांनी भजनात ठेका धरल्याचे पाहायला मिळत आहे. 

आणखी वाचा –  “बॉयफ्रेंड व फ्रेंडमध्ये फरक काय?” आदिनाथच्या कोठारेच्या लेकीने त्याला विचारला वेगळाच प्रश्न, म्हणाला, “बरेच लोक…”

दरम्यान, मुग्धा-प्रथमेश यांच्या गायनाचे अनेक चाहते आहेत. हे दोघेही देश-परदेशात त्यांच्या गाण्याचे कार्यक्रम करत असतात. तसेच सोशल मीडियाद्वारेहीते त्यांच्या गाण्याचे व्हिडीओ शेअर करत असतात. अशातच मुग्धाने शेअर केलेला व्हिडीओही चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. या व्हिडीओला चाहतेमंडळी चांगलाच प्रतिसाद देत आहेत.

Tags: marathi entertainment newsmarathi singermugdha vaishampayan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
Next Post
Kranti Redkar Answers To Netizens

"तुम्हाला चित्रपट भेटत नाही का?", कमेंट करणाऱ्याला क्रांती रेडकरने चांगलंच सुनावलं, म्हणाली, "माझ्या दोन्ही मुली…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.