रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुम्हाला चित्रपट भेटत नाही का?”, कमेंट करणाऱ्याला क्रांती रेडकरने चांगलंच सुनावलं, म्हणाली, “माझ्या दोन्ही मुली…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 28, 2024 | 1:58 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kranti Redkar Answers To Netizens

"तुम्हाला चित्रपट भेटत नाही का?", कमेंट करणाऱ्याला क्रांती रेडकरने चांगलंच सुनावलं, म्हणाली, "माझ्या दोन्ही मुली..."

अभिनेत्री क्रांती रेडकरने आजवर अनेक चित्रपट, मालिका यांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. क्रांती नेहमीच तिच्या सोशल मीडियावरील वावरामुळे चर्चेत असते. सोशल मीडिया हे सध्या मनोरंजनाचे साधन आहे. सोशल मीडियाद्वारे अनेकजण वेगळ्या प्रकारचा कंटेट तयार करतात आणि चाहत्यांसह शेअर करतात. अशातच क्रांती नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही कंटेंट शेअर करताना दिसते. विविध, हटके रील व्हिडीओ ती नेहमीच शेअर करताना दिसते. (Kranti Redkar Answers To Netizens)

बरेचदा या रील व्हिडीओमुळे क्रांतीला ट्रोलही करण्यात आलं आहे. अनेकदा क्रांतीने या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष केलं आहे तर काहीवेळा या ट्रोलिंगवर भाष्य करत सडेतोड उत्तरही दिलं आहे. लग्नानंतर क्रांती तिच्या सांसारात अधिक रमलेली दिसली. त्यानंतर तिने जुळ्या मुलींना जन्म दिला. मुली झाल्यानंतर क्रांतीने सिनेविश्वातून काहीसा ब्रेक घेतलेला पाहायला मिळाला. क्रांती फारशी सिनेसृष्टीत दिसली नाही यावरुन तिला नेटकऱ्याने प्रश्न विचारला आहे.

आणखी वाचा – मुंबईतील महागड्या ठिकाणी आमिर खानने खरेदी केलं नवं घर, एकूण किंमत आहे तब्बल…

View this post on Instagram

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

“तुम्हाला चित्रपट ‘भेटत’ नाही का?” असा प्रश्न नेटकऱ्याने क्रांतीच्या पोस्टखाली विचारला. माणसं भेटतात आणि वस्तू मिळतात ही गोष्ट साऱ्यांना ज्ञात आहे. असे असूनही नेटकऱ्याने प्रश्न विचारताच क्रांतीने व्याकरणाची चूक केली आहे. यावर क्रांतीने नेटकऱ्यांच्या प्रश्नांवर उत्तर देण्याआधी व्याकरणाची चूक सुधारत उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा – प्रियाने सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सगळ्यांसमोर आणलं, खोटा पुरावा समजून पूर्णा आजींनी तिच्याच कानाखाली लगावली अन्…

“चित्रपट ‘भेटत नाही’, ‘मिळतो’ आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मला कधी कधी चित्रपट मिळत नाहीत आणि कधी कधी मिळतात. पण, सध्या माझ्या दोन्ही मुली लहान आहेत. त्यामुळे अनेकदा माझ्या शूटिंगच्या तारखा जुळत नाहीत. आता येत्या काळात मी काही चित्रपट करत आहे. ते लवकरच प्रदर्शित होतील”, असं उत्तर तिने नेटकऱ्याच्या प्रश्नावर दिलं आहे.

Tags: kranti redkarKranti Redkar Answers To Netizensmarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Sai Tamhankar On Her Wedding Dress

घटस्फोटानंतर लग्नाची साडी टाकून न देण्याचा सई ताम्हणकरचा निर्णय, त्याचाच शिवला ड्रेस, म्हणाली, "हा ड्रेस खूप जास्त स्पेशल…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.