कलाकार हा नेहमीच कलेसाठी प्रामाणिकपणे काम करत असतो. पण एक वेळ अशी येते जेव्हा आपल्या जीवापेक्षा मोठं काहीच नसतं. असंच म्हणण्याची वेळ आता अभिनेता सौरभ चौगुलेची आली आहे. “जीव माझा गुंतला” या मालिकेतील सर्वांचा लाडका मल्हार म्हणजे अभिनेता सौरभ चौगुलेचा मालिकेच्या सेटवर अपघात झाल्यानं त्याच्या पायाला दुखापत झाली. पायाला दुखापत झाल्यानं सौरभला दोन पावलं चालणंही कठीण झालं आहे. सौरभने सोशल मीडियावर ही दुखापत कशी झाली याची माहिती शेअर केलीये.(saorabh choughule)
अशी झाली सौरभच्या पायाला दुखापत..(saorabh choughule)
सौरभच्या पायाला सध्या फॅक्चर झालाय. गेल्या काही दिवसांपूर्वी तो एक सीन शूट करताना त्याच्या पाहायला ही दुखापत झाली. सौरभ दुखऱ्या पायानं मालिकेचं शुटींग करत होता. पण दुखणं वाढत असल्यानं सौरभला डॉक्टरांच्या सल्ल्यानं आराम करण्यावाचून पर्याय नाही अस सांगितलं. पायाच्या दुखण्यानं सौरभला चालणं कठीण झालंय. त्यामुळे सेटवर चालण्यासाठी सौरभ सपोर्टचा वापरत करत आहे.

सौरभने व्हिडीओ शेअर करत दुखापत कशी झाली याची माहिती सांगितली.चला पाहुयात पोस्ट शेअर करत त्याने प्रेक्षकांचे आभार सुद्धा मानले आहेत त्याने म्हटलंय ,अहो मित्रांनो तुमच्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद मी बरा होत आहे. माफ करा तुम्हा सर्वांना उत्तर देता आले नाही आणि हे उशीरा पोस्ट करत आहे. खूप खूप प्रेम.
चाहत्यांचे मानले आभार..
सौरभच्या पायाला झालेली ही दुखापत पाहून अनेक चाहत्यांनी चिंता व्यक्त करत,काळजी घ्या,गेट वेल सून, काळजी घ्यावी स्टंट करताना,अश्या अनेक कॉमेंट केल्या आहेत .
====
हे देखील वाचा – मोठ्या स्टार सोबत चित्रपट,मोठ्या शो मध्ये इंट्री शिव ठाकरे ने सांगितले त्याचे आगामी प्रोजेक्ट्स
====
‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून सौरभ चौगुले हा मुख्य भूमिकेत पाहायला मिळतोय. सौरभ हा इंजिनियर असून स्वतःमधल्या अभिनेत्याला ओळखून त्याने वेळीच आपल्या कल अभिनयाकडे वळवला. एकांकिका प्रायोगिक नाटक, राज्य नाट्य संस्था या सगळ्या माध्यमातून तो रंगभूमीशी एकरूप होत होता. तसेच तो आपल्याला “रूप नगर के चिते” या चित्रपटात देखील एका मुख्य भूमिकेत पाहायला मिळाला असून चाहत्यांनी त्याच्या या भूमिकेला देखील पसंती दिली आहे.(saorabh choughule)