‘जीव माझा गुंतला’ फेम मल्हार-अंतराची ऑनस्क्रीन जोडी नुकतीच त्यांच्या खऱ्या आयुष्यातही एकत्र आली आहे. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या योगिता चव्हाण व सौरभ चौघुले यांनी एकमेकांबरोबर लग्न करत त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. ३ मार्चला योगिता-सौरभ यांचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला होता. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावेळी दोघांनी घेतलेल्या खास उखाण्यांचीदेखील सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती.
लग्नसोहळा पार पडल्यावर योगिता-सौरभ हनिमूनला गेले होते. हनिमून पार पडल्यानंतर नुकतेच हे जोडपं मुंबईत परतले. यावेळी मुंबई विमानतळावर योगिता-सौरभ यांची पापाराझींनी खास विचारपूस केली. यावेळी योगिता-सौरभ यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतल्याचे पाहायला मिळाले. योगिता-सौरभ यांचा हा विमानतळावरील व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. योगिता-सौरभ हे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सोशल मीडियाद्वारे ते त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात.

अशातच लग्नाच्या फोटोंनंतर सौरभने नुकतेच त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक खास फोटो शेअर केला आहे.. या फोटोसह त्याने लिहिलेल्या कॅप्शनमुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. सौरभने त्याचा एक सेल्फी फोटो शेअर करत “योगिता माझ्यासाठी पुरणपोळी बनवशील का?” असं म्हटलं आहे. तसेच त्याने योगिताला टॅगही केलं आहे. सौरभच्या या फोटोला योगितानेही उत्तर दिलं आहे. “शूटिंगवरुन घरी ये. बनवते.” असं म्हणत योगिताने सौरभसाठी पुरणपोळी बनवणार असल्याचे सांगितले आहे.

होळी सण अगदी जवळ आला असून होळी व पुरणपोळी हे मिश्रण कायमच खास राहिलं आहे. होळीला रंगांशिवाय जसे पूर्णत्व येत नाही. अगदी तसंच होळी ही पुरणपोळी शिवायदेखील पूर्ण होत नाही. त्यामुळे अगदी उद्यावर आलेली होळी आणि “योगिता बनवशील का पुरणपोळी” म्हणत सौरभने शेअर केलेल्या या फोटोमुळे योगिता-सौरभ यांच्याबद्दल त्यांच्या चाहत्यांसह सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.
दरम्यान, सौरभ-योगिताच्या पापाराझींच्या व्हायरल व्हिडीओमध्ये सौरभने त्याला त्याच्या घरच्या जेवणाची आठवण येत असल्याचे म्हटले होते.