शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘फकिरीयत’मधील ‘चलो चले…’ हे संतोष जुवेकरचे गाणे प्रदर्शित, भक्तिरसात बुडालेला दिसला आणि…; अभिनेत्याचा हटके लूक चर्चेत

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 2, 2025 | 4:50 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Santosh Juvekar Song

'फकिरीयत'मधील 'चलो चले…' हे संतोष जुवेकरचे गाणे प्रदर्शित, भक्तिरसात बुडालेला दिसला आणि…; अभिनेत्याचा हटके लूक चर्चेत

Santosh Juvekar Song : ‘फकिरीयत’ हा आगामी हिंदी चित्रपट संगीतप्रेमींसाठी आध्यात्मिक गीत-संगीताची अनोखी मेजवानी घेऊन आला आहे. या चित्रपटातील गाणी मनामनांत भक्तीभावाची ज्योत प्रज्ज्वलित करणारी ठरणार असल्याची झलक नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘फकिरीयत’मधील एका नवीन गाण्यात पाहायला मिळते. ‘फकिरीयत’ हा चित्रपट आध्यात्म, गुरूभक्ती, क्रियायोग आणि श्रद्धा यांची प्रचिती देत जीवनाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. या चित्रपटातील ‘चलो चले हम बाबाजी के देस…’ हे गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे.

भद्रबाहू डिव्हाइन क्रिएशन्स एलएलपीच्या बॅनरखाली ‘फकिरीयत’ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. दिग्दर्शक संतोष मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘फकिरीतय’ हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. ‘चिरुट जलती है’ आणि ‘अध्यात्म एक विद्रोह, एक क्रांती’ या अनुजा जानवलेकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांवर या चित्रपटाची कथा आधारलेली आहे. ‘फकिरीयत’ची पटकथा अनिल पवार यांनी लिहीली असून, अनुजा जानवलेकर यांच्यासोबत पवार यांनी संवादही लिहिले आहेत.

आणखी वाचा – “तू अजून हवी होतीस…”, मालिकेत एकत्र काम करतानाच्या प्रियाबरोबरच्या आठवणी शेअर करत अभिजीत भावुक, म्हणाला, “खोटे दिलासे शेवटी…”

गुरूमाई माँ रुद्रात्मिका यांच्या आध्यात्मिक प्रवासावर आधारलेल्या या चित्रपटात महावतार बाबाजींच्या महतीसोबतच गुरुमाई माँ रुद्रात्मिका यांचा त्यांच्या गुरु कार्यासाठीचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. प्रदर्शित करण्यात आलेले ‘चलो चले हम बाबाजी के देस…’ हे गाणे उत्तराखंडमधील नयनरम्य लोकेशन्सवर चित्रित करण्यात आले आहे. ‘चलो चले…’चा सूर आळवत हाताने टाळी आणि मुखाने मानस्मरण करीत श्री महावतार बाबाजींचे भक्तगण एकत्र येतात. भक्तांच्या या घोळक्यात अभिनेता संतोष जुवेकरही सामील होताच ‘चलो चले हम बाबाजी के देस…’ हे गाणे सुरू होते. उंचच उंच पर्वतरांगांमधून वाट काढत पायी जाणारे भक्तीरसात तल्लीन झालेले बाबाजींचे शिष्यगण गाण्यात आहेत. समृद्धी पवार यांच्या लेखणीतून अवतरलेल्या या गाण्यातील शब्द मनाला भिडणारे असून, आध्यात्मिक अनुभूती देणारे आहेत. त्यावर संगीतकार प्रवीण कुंवर यांनी सुमधूर संगीताचा साज चढवला आहे. मनोज मिश्रा आणि डॅा. नेहा राजपाल यांनी हे गाणे गायले आहे.

आणखी वाचा – जुई गडकरी घेतेय ‘या’ विषयांत शिक्षण, सेटवर अभ्यास पूर्ण करताना दिसली आणि…; शिक्षण-अभिनय सांभाळताना होतेय तारांबळ

संत विचारांचा अनमोल नजराणा घेऊन आलेल्या ‘फकिरीयत’मध्ये दीपा परब, उदय टिकेकर, संदेश जाधव, विनीत शर्मा, अक्षय वर्तक, नयन जाधव, संदेश जाधव, अनीषा सबनीस आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. डिओपी अजित रेड्डी यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, निलेश गावंड यांनी संकलन केले आहे. गीतकार समृद्धी पवार यांनी लिहिलेली गीते संगीतकार प्रवीण कुंवर यांनी संगीतबद्ध केली आहेत.

Tags: hindi moviesantosh juvekarsantosh juvekar song
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
dipika kakar health news

"माझी प्रकृती गंभीर आहे", दीपिका कक्करचे वाईट हाल, ट्युमरच्या निदनानंतर शरीरात व्हायरल इन्फेक्शन

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.