नाटक व मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे नेहमी विविध कारणांनी चर्चेत असतो. संकर्षणचे ‘तू म्हणशील तसं’, ‘नियम व अटी लागू’ आणि ‘संकर्षण via स्पृहा’ ही तीन नाटक रंगभूमीवर सुरु आहेत. त्याच्या सर्व नाटकांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर संकर्षण उत्तम कवी सुद्धा असून त्याच्या कविता चाहत्यांसमोर तो सादर करत असतो. संकर्षण सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत अनेक फोटोज व व्हिडिओज शेअर करत असतो. असाच एक व्हिडिओ संकर्षणने नुकतंच शेअर केला आहे, ज्यात त्याने या व्हिडिओसोबत एक सुंदर अशी चारोळी लिहिली आहे. (sankarshan karhade viral post)
अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. भारतीय सैन्यदलातील एक जवान भरतीनंतर पहिल्यांदा आपल्या घरी आला आहे. तेव्हा त्याच्या घरातील सदस्य त्याचे स्वागत करताना दिसत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ पाहताना संकर्षण कऱ्हाडे भावुक झाला. आणि त्याच्यासाठी एक चारोळी सादर केली आहे.
हे देखील वाचा – मराठमोळ्या अभिनेत्रींमध्ये ऐश्वर्या नारकर शिक्षणात अव्वल, स्वतःच सांगितलं किती झालं आहे शिक्षण?
अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने चारोळी लिहीत व्हायरल व्हिडिओ शेअर केला आहे. ही चारोळी लिहिताना संकर्षण म्हणतो, “हा व्हिडियो मला खूप आवडला. भारतीय सैन्यात भरती झाल्यावर पहिल्यांदा आपल्या घरी आलेला आपला जवान. पायघड्या घालून घरच्यांनी स्वागत केलंय. खरंच….
‘देशासाठी काम करावं वाटणं, ह्याच्यासारखी भूक नाही…
सुरकुतलेला हात पाठीवर फिरावा, ह्याच्यासारखं सुख नाही
आई बापाच्या पायावर डोकं, ह्याच्यासारखं पवित्रं स्थान नाही…
भारत देशाची सेवा करायला मिळणं, ह्याच्यासारखी शान नाही‘ “
हे देखील वाचा – मराठीमध्ये आणखी एका मल्टीस्टारर चित्रपटाची घोषणा, पार्थ भालेराव दिसणार मुख्य भूमिकेत, चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित
याआधी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेंने छोट्या पडद्यावरील एका कार्यक्रमात कविता सादर केली होती. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. संकर्षणने नाटकांबरोबर मालिकांमध्येही काम केलं आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मध्ये साकारलेलं ‘समीर’ हे पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडलं होतं.