शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘सनम तेरी कसम’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, पाकिस्तानी अभिनेत्याबरोबर बांधली लग्नगाठ

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 6, 2025 | 9:33 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mawra Hocane married to Amir Geelani

'सनम तेरी कसम' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Mawra Hocane marriage : बॉलिवूडचा सनम तरी कसम’ हा लोकप्रिय चित्रपट सर्वांना माहीतच असेल. अनेक प्रेमी युगुलांसाठी हा चित्रपट म्हणजे प्रेमाचा विषय आहे. याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री म्हणजे मावरा होकेन. आपल्या सहजसुंदर अभिनयाने तिने अनेकांची मनं जिंकली आहेत. याच अभिनेत्रीबद्दल एक मोठी माहिती समोर येत आहे ती म्हणजे मावरा होकेन नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. मागील अनेक दिवसांपासून मावराच्या अफेअरच्या व लग्नाच्या चर्चा सुरू होत्या. अखेर तिने स्वतः फोटो पोस्ट करून लग्नाची माहिती दिली आहे. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी अमीर गिलानीबरोबर तिने लग्नगाठ बांधली. (Mawra Hocane marriage)

मावराने बुधवारी तिच्या निकाहचे रोमँटिक फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. मावरा व अमीर यांनी रोमँटिक पोज देत फोटो काढले. तिच्या लग्नाचे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले की, “आणि या सर्व गोंधळातही मी तुला शोधले. बिस्मिल्लाह”. मावरा व अमीरच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे आणि दोघांना त्यांच्या आयुष्याच्या नवीन प्रवासाबद्दल शुभेच्छादेखील दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by MAWRA (@mawrellous)

आणखी वाचा – लग्नाची पत्रिका घेऊन अंकिता वालावलकर स्वामींच्या चरणी, अक्कलकोटमध्ये होणाऱ्या नवऱ्यासह अन्नसेवा, व्हिडीओने वेधलं लक्ष

मावरा आणि अमीर यापूर्वी सबात’ आणि ‘नीम’ सारख्या लोकप्रिय टेलिव्हिजन ड्रामामध्ये एकत्र झळकले होते. दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल कधीच जाहीर कबुली दिली नव्हती. पण अनेक कार्यक्रमांना ते दोघे एकत्र हजेरी लावायचे. तसेच सोशल मीडियावरही एकमेकांबद्दल पोस्ट करायचे, त्यामुळे ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा कायम होत असत आणि अखेर या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. दोघांनीही लग्न करुन आपल्या नात्यावर अखेरचं शिक्कामोर्तब केलं आहे.

आणखी वाचा – खास सरप्राइज! प्रेक्षकांना अनुभवता येणार ‘मैत्रीचा ७/१२’, इट्स मज्जाकडून नव्या वेबसीरिजची घोषणा, पहिलं पोस्टर प्रदर्शित

दरम्यान, मावराच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिने हर्षवर्धन राणेबरोबर ‘सनम तेरी कसम’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या एका चित्रपटामुळे आणि तिच्या अभिनयामुळे तिने भारतात प्रचंड मोठा चाहतावर्ग बनवला. २०१६ मध्ये आलेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांवरील जादू आजही लोकांच्या मनात कायम आहे. येत्या व्हॅलेंटाईनच्या निमित्ताने ७ फेब्रुवारीला हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित केला जाणार आहे.

Tags: mawra hocaneMawra Hocane marriagemawra hocane wedding
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bharti Singh decided to retire

"८-१० वर्षांनंतर मी आणि हर्ष निवृत्ती घेणार", लाफ्टर क्वीन भारती सिंहचा मोठा खुलासा, म्हणाली, "पती-पत्नी म्हणून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.