मराठी कलाविश्वात आज असे काही कलाकार आहेत.ज्यांनी अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. त्यातलाच एक कलाकार म्हणजे विनोदी अभिनेता समीर चौगुले. उत्तम विनोदबुद्धीमुळे हा अभिनेता आज घराघरात पोहोचला. विशेष म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्राच्या माध्यमातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारा समीर, प्रेक्षकांना त्यांच्या घरातील एक सदस्य असल्याप्रमाणेच भासतो.(Samir Choughule Post Viral)
समीर सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. समीरने महाराष्ट्राची हास्यजत्रामधील सहकलाकारांच्या वाढदिवसला आवर्जून पोस्ट शेअर करतो. हास्यजत्रेचे सर्वस्व म्हणजे पांढऱ्या केसांचा राजकुमार म्हणून ओळख असलेले सचिन गोस्वामी यांच्यासाठी खास पोस्ट केली आहे.
समीरची सचिन गोस्वामींसाठी स्पेशल पोस्ट
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा सचिन सर……हा फोटो माझ्या तुमच्या प्रती आणि तुमच्या माझ्या प्रती असलेल्या सर्व भावनांचा कोलाज आहे…सातत्याने दर्जेदार आणि सुविहित विनोद निर्मिती करण्याची अजब शक्ती असलेला हा माणूस….या माणसाचा मेंदू तयार झाल्यावर देव ही अचंबित होऊन स्वतःशी म्हणाला असेल “अरे हे काय घडलं माझ्या हातून?”…..ही एक अशी अभिजात फॅक्टरी आहे ज्यात प्रत्येक कलाकाराने एकदा तरी “कामगार” म्हणून काम केलच पाहिजे…. (Samir Choughule Post Viral)

====
हे देखील वाचा – IIT मद्रासमध्ये घुमणार ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या’ नावाचं वादळ
====
“आपल नेमक काय चुकतंय” या संभ्रमात आपण असताना सचिन गोस्वामी सर नामक सातत्याने आपल्या जवळ असणे हे आम्हा सर्वांसाठी खूप भाग्याचं आहे….रोज प्रहसन झाल्यावर पुन्हा कोरी पाटी घेऊन सरांसमोर रोज बसणे यालाच कदाचित “घडणे” म्हणतात…..मालिका रंगभूमी चित्रपट सर्व माध्यमातील कामाचा अत्यंत प्रदीर्घ अनुभव, रोखठोक आणि सुस्पष्ट विचार, योग्य आणि चौकस परखड राजकीय आणि सामाजिक भान असणारे आमचे सर माझ्या वैयक्तिक आयुष्यात ही मोठ्या भावा प्रमाणेच आहेत…….सर तुम्ही आमच्या पाठीशी असणे हेच खूप धीर देणार आहे, आपल्या कामावर नितांत प्रेम वाढवणार आहे…तुम्हाला खूप खूप खूप प्रेम आणि आदर …happy birthday सर…अश्या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.या सोबतच हास्यजत्रेतील गौरव मोरे , प्रसाद खांडेकर ,रसिक वेंगुर्लेकर ,चेतना भट, इशा डे अश्या सर्वच कलाकारांनी देखील सचिन गोस्वामी यांच्यासोबाबतचे फोटो शेअर करत त्यांच्यासाठी स्पेशल पोस्ट केली. यावरून त्यांना सचिन गोस्वामी यांच्याबद्दलचा आदर आणि प्रेम पाहायला मिळतंय. तर यशोएबत अनेक चाहत्यांनी देखील सचिन गोस्वामींवर शुभेच्छांचा वर्षाव केला(Samir Choughule Post Viral)
सचिन गोस्वामी हे उत्तम अभिनेत्यासोबतच ते उत्तम लेखक आणि दिग्दर्शकही आहेत.त्यांनी चंद्रमुखी,पुणे वाया बिहार अश्या काही चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.