शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

विमानतळावर मुद्दाम सेलिब्रिटींची अधिक तपासणी करतात समीर वानखेडे? म्हणाले, “एअरपोर्टवर असताना…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 4, 2023 | 10:46 am
in Trending
Reading Time: 5 mins read
google-news
wankhede talks about drug

विमानतळावर मुद्दाम सेलिब्रिटींची अधिक तपासणी करतात समीर वानखेडे? म्हणाले, “एअरपोर्टवर असताना...”

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे नाव चर्चेत आलं. समीर वानखेडे हे नाव गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने चर्चेत आहे. मात्र या सगळ्या प्रकरणात त्यांची पत्नी व अभिनेत्री क्रांती रेडकर त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली. आर्यन खान ड्रग्ज प्रकरण सगळीकडेच गाजत असताना त्यांनी स्वतः हुशारीने स्वतःची संपूर्ण जबाबदारी निभावली. आता एकंदरीतच त्यांचं काम, ड्रग्ज प्रकरण यावर समीर वानखेडे भाष्य करणार आहेत. झी मराठी वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुपते’ कार्यक्रमामध्ये समीर वानखेडे हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रोमो आता समोर आले आहेत.

झी मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटद्वारे ‘खुपते तिथे गुप्ते’च्या नव्या भागाचे प्रमो शेअर केले आहेत. या प्रोमोमध्ये समीर वानखेडे बेधडक बोलताना दिसत आहेत. “सेलिब्रिटींना विमानतळावर सगळ्यात जास्त भीती समीर वानखेडे या नावाची वाटायची. वानखेडे मुद्दाम सेलिब्रिटीची खूप जास्त तपासणी करायला लावतात असं लोक म्हणायचे” असं अवधुत गुप्तेने समीर वानखेडे यांना विचारलं.

आणखी वाचा – “नितीन देसाईंना कोणी छळलं हे त्यांच्या मित्रांना माहित आहे”, जितेंद्र आव्हाडांचा मोठा खुलासा, म्हणाले, “रसेल शाह यांचा…”

यावर त्यांनी उत्तर दिलं की, “माझ्यासाठी सेलिब्रिटी म्हणजे बाबा आमटे, सिंधुताई सकपाळ, एपीजे अब्दुल कलाम. विमानतळावर असताना जवळपास साडेतीन हजार केस होत्या. त्यामध्ये तुमच्या भाषेमध्ये जे सेलिब्रिटी तुम्ही म्हणता ते किती असतील? ५०, १५०, १०० असतील… पण बाकीचे जे लोक आहेत ते कोण आहेत? बाकीचे लोक गंभीर गुन्हे करणारे, ड्रग पेडलर्स आहेत. त्यांच्याबद्दल कुणीच काही सांगत नाही”.

आणखी वाचा – शेवटचा फोन, चिट्ठी, धनुष्यबाण बनवलं अन्…; नितीन देसाईंच्या कर्मचाऱ्याने सांगितलं संपूर्ण सत्य, म्हणाला, “गळफास घेतलेल्या अवस्थेत…”

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – “त्याच्याशी बोलायला हवं होतं”, नितीन देसाईंच्या निधनानंतर महेश मांजरेकर भावुक, म्हणाले, “त्याला मी शेवटचं पाहिलं तेव्हा…”

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

तसेच ड्रग्जचं सेवन करणं म्हणजे फक्त शरीराचं नव्हे तर राष्ट्राचंही नुकसान असल्याचं समीर वानखेडे यांचं म्हणणं आहे. ड्रग्जचं सेवन करणं पूर्णपणे बंद झालं पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. आता या कार्यक्रमामध्ये ते आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाबाबत काही भाष्य करणार का?, या प्रकरणाविषयी काही खुलासा करणारा का? याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Tags: entertainmentmarathi actressSameer Wankhede
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
siddharth chandekar Fitness

अबब! सिद्धार्थ चांदेकरने पाच महिन्यांत घटवलं इतकं वजन, म्हणाला, "१०३ किलोवरून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.