सध्या सर्वत्र एक चर्चा सुरु आहे ती म्हणजे हेमा समितीच्या अहवालाची. या पूर्वी कास्टिंग काऊच सारख्या प्रकरणांवर पुढे आलेल्या घटनांबाबत #MeToo च्या माध्यमातून अनेक पीडितांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध भाष्य केलं आहे. मल्याळम इंडस्ट्रीत होत असेलल्या लैंगिक शोषणा बद्दल अनेक पुरावे या अहवालात समोर आले आहेत. या अहवालानुसार अनेक मल्याळम अभिनेत्रींनी स्वतःहून पुढे येत अनेक अभिनेते व दिगदर्शकांबद्दल खुलासा करत आपल्यावर होणाऱ्या लैंगिक शोषणाची माहिती दिली आहे. आता या बाबत सलमान खानची एक्स-गर्लफ्रेंड सोमी अलीने देखील मोठा खुलासा केला आहे. (Somy Ali on Sexual Harasment)
बॉलीवूड अभिनेता सलमान खानची एक्स-गर्लफ्रेंड सोमी अलीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये लैंगिक शोषणाबद्दल मोठा खुलासा केला आहे. सोमी अलीने यापूर्वी अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये अभिनय करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अभिनेता सलमान खानसह देखील तिने चित्रपटांमध्ये काम केले असून या दोघांमध्ये एक खास नातं देखील पाहायला मिळालं होतं. सध्या जगभरातून अनेक महिला,अभिनेत्री #MeToo मोहिमेमध्ये सहभाग घेऊन आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध करत आहेत.
हे देखील वाचा- आयसीयुमध्ये आहे बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री, आर्थिक संकटामुळे खर्चही परवडेना, कलाकारांकडून मदतीचा हात अन्…
सोमी अलीने एका मुलाखतीत बॉलीवूड इंडस्ट्रीत होणाऱ्या लैंगिक शोषणाबाबत भाष्य केलं आहे. सोमी अली म्हणाली,”मला करिअरच्या सुरुवातीच्या काळात असं सांगण्यात आलं होतं कि तुला जर तुझं करिअर पुढे घेऊन जायचं असेल तर तुला तडजोड करावी लागेल. तुला काही खास कलाकारांच्या रूममध्ये देखील जावं लागेल”. कोणाचही नाव न घेता सोमीने बॉलीवुडमधील काही कलाकारांवर आरोप केले आहेत. (Somy Ali on Sexual Harasment)
हे देखील वाचा- Video : पिकनिकमध्ये संतोषने एकट्यानेच केलं काम, त्याची अवस्था पाहून कुशलला हसू आवरेना, व्हिडीओही केला शेअर, म्हणाला, “सगळ्यांची काळजी…”
पुढे खुलासा करत सोमी म्हणाली, “अनेक महिलांना मी प्रसिद्ध अभिनेत्यांच्या बंगल्यामधून पहाटे पहाटे अस्थाव्यस्त अवस्थेत बाहेर येताना पाहिलं आहे. हे अभिनेते मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते. समाजात या कलाकारांप्रती प्रचंड आदर आणि प्रेमाची भावना आहे. पण त्यांचं खरं रूप मात्र खूप भयंकर आहे.” मल्याळम चित्रपट सृष्टीसह बॉलीवूडमध्ये देखील अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्या हळू हळू आता जनते समोर येत आहे. सोमी अलीने या खुलास्या दरम्यान कोणत्याही कलाकाराचं नाव घेतलं नाही.