शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सलमान खानने खरेदी केली कोटींची नवीन बुलेट प्रूफ व हायटेक कार, लॉरेन्स बिश्नोईच्या धमक्यांमुळे सुरक्षेत वाढ

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 19, 2024 | 10:51 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Salman Khan New Bulletproof Car

सलमान खानने खरेदी केली कोटींची नवीन बुलेट प्रूफ

Salman Khan New Bulletproof Car : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या जीवाला धोका असल्याचं समोर आलं आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सतत अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे. त्यांचे पुढील टार्गेट सलमान खान असल्याचे त्यांनी आणि त्यांच्या टोळ्यांनी सांगितले आहे. या दरम्यान, अभिनेत्याने नवीन बुलेट प्रूफ कार खरेदी केली आहे, ज्याची चर्चा सर्वत्र आहे. सलमानने बुलेट प्रूफ असलेली नवी निसान पेट्रोल एसयूव्ही खरेदी केली आहे. अभिनेत्याकडे आधीच लँड क्रूझर आणि निसान पेट्रोल या गाड्या होत्या. आता सुरक्षेच्या कारणास्तव त्याने ही तिसरी कारदेखील खरेदी केली आहे.

‘इटाइम्स’च्या वृत्तानुसार, या बुलेटप्रूफ गाडीची किंमत २ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या आधीच्या कारप्रमाणेच सलमान खानने त्याची ही नवी कार दुबईहून आयात केली आहे. सलमानचे जवळचे मित्र आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची नुकतीच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. लॉरेन्स बिश्नोईने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आणि बाबा सिद्दिकीची सलमानबरोबरची मैत्री हे हत्येमागील कारण सांगितले. बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईने सलमानला धमक्या देण्यास सुरुवात केली.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : पारू-आदित्यच्या नव्या नात्याची सुरुवात, खास भेटवस्तूही दिली अन्…; मालिकेत नवा ट्विस्ट

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

शुक्रवार, १८ ऑक्टोबर रोजी सकाळी बिश्नोई टोळीने मुंबई वाहतूक पोलिसांना एका संदेशात सलमानला धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच लॉरेन्स बिश्नोईशी असलेले अभिनेत्याचे वैर संपुष्टात यावे यासाठी ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली. सततच्या धमक्यांमुळे सलमान नाराज तर आहेच, शिवाय त्याचे कुटुंबीयही घाबरले आहेत. अशा परिस्थितीत, अभिनेत्याची सुरक्षा तर वाढवली गेलीच पण अनेक भक्कम सुरक्षा वैशिष्ट्यांसह नवीन वाहन देखील खरेदी करण्यात आले आहे. असे सांगण्यात येत आहे की. या वाहनामध्ये बॉम्ब अलर्ट इंडिकेटर, जवळच्या गोळीबारापासून संरक्षण करण्यासाठी जाड मजबूत काचे आणि टिंटेड खिडक्या आहेत, जेणेकरुन वाहन चालक आणि वाहनात बसलेल्या कोणत्याही व्यक्तीची ओळख लपवता येईल.

आणखी वाचा – “लग्नाची सगळी तयारी झालीय पण…”, प्राजक्ता माळीचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटकरी म्हणाले…

निसान पेट्रोल एसयूव्ही सध्या भारतात उपलब्ध नसल्याने सलमानने ती दुबईहून आयात केली. दुसरीकडे, धमक्या मिळाल्यानंतरही सलमान कामावर परतला आहे. तो १७ ऑक्टोबर रोजी ‘बिग बॉस १८’ च्या सेटवर पोहोचला आणि शुक्रवारी ‘वीकेंड का वार’चे दोन्ही भाग शूट केले. यावेळी, बिग बॉसच्या संपूर्ण टीमला शूट संपेपर्यंत सेटवर थांबण्याचा आदेश देण्यात आला. ६० रक्षकांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले होते आणि सलमानसाठी एक खास कंपाउंड तयार करण्यात आले होते, ज्याच्या मध्यभागी सलमान कडक सुरक्षेत राहणार आहे.

Tags: salman khanSalman Khan New Bulletproof Carsalman khan new car
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Amey Wagh, Amruta Khanwilkar and Jui Bhagwat Starring Like Aani Subscribe Marathi movie Review

Like Aani Subscribe Review : 'लाईक आणि सबस्क्राईब'मध्ये गुंतलेली मर्डर मिस्ट्री

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.