बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा बहुप्रतीक्षित ‘टायगर ३’ चित्रपट काल दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला. एकीकडे, सर्वत्र दिवाळीचा माहौल असताना ‘एक था टायगर’चा तिसरा भाग असलेला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी पहिल्याच दिवसांपासून गर्दी केली होती. यावेळी सलमानच्या चाहत्यांनी ठिकठिकाणी फटाके फोडत, ढोल-ताशे वाजवत अभिनेत्याचे स्वागत केले. तसेच, प्रेक्षकांमध्ये यावेळी मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. एकूणच, चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले असून या आकड्यांनुसार चित्रपटाने जबरदस्त कमाई केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. (Tiger 3 Box office Collection Day 1)
सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांची मुख्य भूमिका असलेल्या या ऍक्शनपॅक चित्रपटाची चाहते बऱ्याच दिवांपासून वाट पाहत होते. अखेर, दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट झाला असून यानिमित्ताने अभिनेत्याच्या चाहत्यांना दिवाळीचं मोठं गिफ्ट मिळालं. त्यामुळेच हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांसह प्रेक्षक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. आता या चित्रपटाच्या कमाईचे आकडे समोर आले. ज्यात पहिल्याच दिवशी चित्रपटाने चांगली कमाई केल्याचं दिसत आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, ‘टायगर ३’ने पहिल्याच दिवशी देशभरात ४४.५० कोटींची कमाई केली आहे. जो सलमानच्या फिल्मी करिअरमधील सर्वात मोठी ओपनिंग कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. पण, शाहरुखच्या ‘जवान’ व ‘पठान’चा विक्रम मोडण्यास ‘टायगर ३’ला थोडे अपयश आले.
हे देखील वाचा – Video : ऋतुजा बागवेने घरीच बनवला कंदील, अगदी सोप्या पद्धतीने तुम्हीही घरीच तयार करु शकता, पाहा व्हिडीओ
शाहरुखच्या ‘पठान’ने पहिल्याच दिवशी ५७ कोटींची कमाई केली होती. तर, याच सप्टेंबरमध्ये आलेल्या ‘जवान’ चित्रपटाने ७५ कोटींची कमाई करत ‘पठान’चा विक्रम मोडला होता. जरी ‘टायगर ३’ शाहरुखच्या दोन्ही चित्रपटांपेक्षा मागे पडला असला, तरी हा चित्रपट पहिल्याच दिवशी मोठी कमाई करण्यात यशस्वी ठरला. सध्या याबाबत चित्रपटाच्या निर्मात्यांनी अधिकृत घोषणा केली नाही.
हे देखील वाचा – “दिव्यांची आरास, पारंपरिक लूक अन्…”, वनिता खरात व सुमित लोंढेची लग्नानंतरची पहिली दिवाळी, चाहते म्हणाले, “लक्ष्मी नारायणाचा जोडा…”
मनीष शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहे. अभिनेत्याचा दमदार ऍक्शनपॅक अंदाज प्रेक्षकांना प्रचंड आवडला. तसेच, सलमान-कतरिना यांच्यातील केमिस्ट्री आणि इम्रान हाश्मीचा खलनायकी अंदाज देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसतो. शिवाय, शाहरुखचा कॅमिओ देखील आकर्षणाचा भाग ठरत आहे. एकूणच, हा चित्रपट सलमानच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणी ठरली आहे.