टेलिव्हिजनवरील लोकप्रिय प्रश्नोत्तरांचा शो म्हणजे ‘कौन बनेगा करोड़पती’. कौन बनेगा करोड़पती’चे आतापर्यंत १५ सीझन्स झाले असून सध्या या शोचा सोळावा सीझन पाहायला मिळणार आहे. येत्या ४ नोव्हेंबरपासून हा सीझन छोट्या स्पर्धकांसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोमध्ये ९ ते १२ वर्षे वयोगटातील १० बालकं सहभागी झाली आहेत. यामध्ये छत्तीसगडच्या अर्जुन अग्रवालने हॉट सीटवर बसून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ‘कौन बनेगा करोडपती १६’ च्या नवीन भागामध्ये पहिला ज्युनिअर स्पर्धक अर्जुन अग्रवाल हॉटसीटवर आला होता. यावेळी त्याने बिग बी अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्याने मोठा झाल्यावर बुद्धिबळ ग्रँडमास्टर आणि डॉक्टर बनायचे आहे असं म्हटलं. (Kon Banega Crorepati 16 News)
अर्जुन अग्रवाल हा ‘कौन बनेगा करोडपती १६ ज्युनिअर’चा पहिला हॉट सीट कंटेस्टंट बनला. फास्टर फिंगर फर्स्ट स्पर्धेत सर्वात कमी वेळेत उत्तर देऊन त्याने हॉट सीटवर जागा मिळवली. अर्जुनने खेळातील अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आणि आपल्या ज्ञानाने केवळ कुटुंबाला नाही, तर संपूर्ण देशाला गर्वित केलं. त्याचं आत्मविश्वास आणि बुद्धिमत्ता यामुळे प्रेक्षकांचं मन जिंकण्यात त्याला यश मिळालं आहे. मात्र, एका प्रश्नाचं उत्तर त्याला देता आलं नाही. शोच्या १३ व्या प्रश्नावर अर्जुन थांबला. कारण त्याला प्रश्नाचे योग्य उत्तर माहीत नव्हतं. या खेळात अर्जुन पुढील प्रश्नांसाठी त्याची लाईफलाइनचा वापर करतो आणि योग्य उत्तरासाठी मदत मागतो. त्यामुळे तो खेळात पुढे जातो.
आणखी वाचा – दुबईवरुन भाऊ येताच माहेरपणाच्या आठवणीत रमल्या विशाखा सुभेदार, डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट, कौतुकाचा वर्षाव
यानंतर, अर्जुन सुपर बॉक्समध्ये ९ प्रश्नांची अचूक उत्तरे देतो आणि त्याची लाइफलाइन ‘आस्क द एक्सपर्ट’ पुन्हा जिवंत करतो. आत्मविश्वास आणि बुद्धिमत्ता यामुळे प्रेक्षकांचं मन जिंकण्यात त्याला यश मिळालं आहे. मात्र, एका प्रश्नाचं उत्तर त्याला देता आलं नाही. शोच्या १३व्या प्रश्नावर अर्जुन थांबला. कारण त्याला प्रश्नाचे योग्य उत्तर माहीत नव्हतं. मारी बिस्किटचं नाव कोणत्या देशाच्या शाही व्यक्तीच्या नावावर ठेवले गेले आहे?
A. इटली
B. रूस
C. मोनाको
D. फ्रांस
या प्रश्नाला अर्जुनने ‘A. इटली’ हे उत्तर दिले. परंतु त्याचे हे उत्तर चुकीचे ठरले. या प्रश्नाचे योग्य उत्तर होते ‘B. रूस’. यानंतर अर्जुन खेळातून बाहेर पडला. मात्र, त्याने आपल्या बुद्धीने सगळ्यांची मने जिंकून घेतली.
आणखी वाचा – लेक अबरामसाठी शाहरुख खानने खरेदी केली कोट्यवधींची कार, फक्त मोजक्याच व्यक्तींकडे आहे ही गाडी, फोटो व्हायरल
दरम्यान, अर्जुनने हॉट सीटवर बसताच त्याला अमिताभ बच्चन यांनी ‘कल्याण भव:’ आशिर्वाद दिला. त्याचबरोबर त्याला एक सोन्याचं नाणं भेट म्हणून मिळालं. या शोमध्ये त्याने १२ लाख ५० हजार रुपये जिंकले. त्याला गेमच्या शेवटी एटमबर्ग कडून एक पंखा आणि अल्ट्रा टेककडून एक खास भेट मिळाली. ‘केबीसी १६’च्या टीमकडून त्याला एक मेडलदेखील देण्यात आले.