शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

५ वर्ष जुनी घटना, नशेत चालवलेली गाडी अन्…; ‘बाजीगर’ फेम दलीप ताहिल यांना होणार २ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा, नेमकं काय घडलं होतं?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 22, 2023 | 11:48 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Dalip Tahil Jail

५ वर्ष जुनी घटना, नशेत चालवलेली गाडी अन्...; 'बाजीगर' फेम दलीप ताहिल यांना होणार २ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा, नेमकं काय घडलं होतं?

‘बाजीगर’, ‘इश्क’, ‘रेस’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसलेले ज्येष्ठ अभिनेते दलीप ताहिल यांना २ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाच वर्षांपूर्वी म्हणजेच २०१८ मध्ये, दलीप यांनी मद्यधुंद अवस्थेत मुंबईच्या खार भागात एका रिक्षेला धडक दिली होती, दरम्यान एक महिला जखमी झाली होती. (Dalip Tahil Jail)

२०१८ मध्ये, दलीप ताहिल यांच्यावर दारू पिऊन नशेत गाडी चालवण्याचा आणि रिक्षाला धडक दिल्याचा आरोप होता. ते दारूच्या नशेत गाडी चालवत होते आणि अपघात झाला. त्यावेळी ते पळून गेल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र, वाहतूक कोंडीमुळे ते सुटू शकले नाहीत. घटनास्थळावरून त्यांना खार पोलीस ठाण्यात आणण्यात आले, तेथे ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचे स्पष्टपणे दिसले. या पुराव्याच्या आधारे, ५ वर्षांनंतर त्यांना दंडाधिकारी न्यायालयात दोषी ठरवण्यात आले आणि त्यांना २ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

आणखी वाचा – “तिच्या डोळ्यातलं कौतुक आणि…”, सलील कुलकर्णी यांची आईसाठी भावुक पोस्ट, लहानपणीचा फोटो शेअर करत म्हणाले, “सगळं अगदी तसंच…”

मागील वृत्तानुसार, दलीप ताहिल यांनी अपघातानंतर घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, मात्र, गणेश विसर्जनामुळे ते गर्दीत अडकले आणि लोकांनी त्यांना पकडून कारमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता तेथे उपस्थित असलेल्या लोकांशी त्यांची बाचाबाची झाली.

मुंबईतील खार पोलीस ठाण्याच्या निरीक्षकाने असे सांगितले होते की, दलीप ताहिल यांनी रक्त तपासणीसाठी नमुने देण्यास नकार दिला होता. पोलिसांनी अपघातात बळी पडलेल्या तिघांची वैद्यकीय तपासणी केली. यानंतर अभिनेता ताहिलला दारू पिऊन आणि निष्काळजीपणाने गाडी चालवल्याबद्दल अटक करण्यात आली होती, मात्र नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती.

आणखी वाचा – मला गरज होती तेव्हा तू… होणाऱ्या नवऱ्यासाठी आमिरच्या लेकीने केलेली पोस्ट चर्चेत, Unseen Photo होतायत व्हायरल

दलीप ताहिल यांनी ‘बाजीगर’, ‘राजा’, ‘इश्क’, ‘रावन’, ‘कहो ना प्यार है’ तसेच ‘सोल्जर’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Tags: bazigarbollywood actorbollywood gossipdalip tahildalip tahil jailentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Samidha Guru Struggle Story

"गरोदर असताना सोडावं लागलं घर", समिधा गुरूने सांगितला हक्काचं घर घेण्यापूर्वीचा कठीण प्रसंग, म्हणाली, "एवढं मोठं पोट घेऊन…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.