मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बापाला मरताना नाही पाहायचंय”, ‘सैराट’ फेम अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, वडिलांची प्रकृती गंभीर आणि…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 9, 2026 | 11:31 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sairat Fame Actor Arbaz Shaikh

"बापाला मरताना नाही पाहायचंय", 'सैराट' फेम अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, वडिलांची प्रकृती गंभीर आणि…

Sairat Fame Actor Arbaz Shaikh : ‘सैराट’ चित्रपटाने अनेक नवोदित कलाकारांना प्लॅटफॉर्म देत सिनेइंडस्ट्रीत नाव कमावण्याची संधी दिली. या सिनेमातल्या प्रत्येक पात्राला विशेष ओळख मिळाली. चित्रपटात रिंकू राजगुरू (Rinku Rajguru), आकाश ठोसर (Akash Thosar), तानाजी गळगुंडे (Tanaji Galgunde) यांसारख्या कलाकारांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. याचबरोबर आपल्या दमदार अभिनयानं सर्वांना दखल घ्यायला भाग पाडलेला अभिनेता म्हणजे, अरबाज शेख (Arbaz Shaikh). अरबाज शेख यानं ‘सैराट’ (Sairat) या सिनेमात ‘सल्या’ची भूमिका साकारली होती. या भूमिकेनंतर त्याला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळालं. मात्र सध्या सैराटमधील हाच सल्या म्हणजे अरबाज शेख संकटात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अरबाज धाय मोकलून रडताना दिसत आहे. वडिलांची तब्येत खालावल्याने एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना होणारी लूट यामुळे तो त्रस्त आहे.

आपल्या डोळ्यांपुढे आपल्या वडिलांना मरताना बघायचं नाही, असं म्हणत अरबाज शेख यानं रडत रडत भावनिक आवाहन केलं आहे. वडिलांचा उपचारासाठी खर्च भगवण्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन देखील त्यानं केलं आहे. अरबाजने असं म्हटलं आहे की, “नमस्कार मी अरबाज शेख, मी आता सोलापुरातील नोबल हॉस्पिटलसमोर उभा आहे. आठ दिवस झाले, पप्पांना ब्रेन हॅमरेज झालंय म्हणून सोलापूरला अॅडमिट केलंय. त्यांचा हार्टचा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही त्यांना सोलापूरला नोबल हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेलं. नोबल हॉस्पिटलचा अनुभव मला इतका घाण आला की, जेव्हा आम्ही पेशंटला तिथे अॅडमिट केलं, तेव्हा सर्वात 10 हजार रुपये डिपॉझिट भरायला सांगितलं, आम्ही ते भरले… त्यानंतर त्यांनी मला गोळ्यांच्या चिठ्ठ्या दिल्या की, या गोळ्या आपल्याला लागतील. मग मी त्यांना विचारलं की, मी हे बाहेरुन आणू शकतो? तर त्यांनी सांगितलं की, नाही तुम्हाला आमच्या मेडिकलमधूनच त्या गोळ्या, इंजेक्शन्स घ्यावा लागतील”.

आणखी वाचा – तुम्हीसुद्धा रात्रीचं उशिरा जेवण करताय?, वेळीच सावधान व्हा, गंभीर…

पुढे त्याने म्हटलं, “मी त्यांच्या मेडिकलमधून औषधं घेतली, तर ती सर्व औषधं 40 हजारांहून जास्त किमतीची होती. त्यांच्याच मेडिकलमधून औषधं घ्यावीत, हा फोर्स होता. यापूर्वी जेव्हा पप्पांना अॅडमिट केलं, तेव्हा तिथे मला असा काहीच अनुभव आला नाही. त्या गोळ्या मी बाहेरुन आणल्या की, जवळपास अर्ध्या किमतीत मला त्या पडत होत्या. पण इथे एवढी लूट होतीय, माझ्या बापाला मला मरताना नाही पाहायचंय, म्हणून मला त्यांना नोबलमधून शिफ्ट करावं लागलं. मला खूपच इथे वाईट अनुभव आलाय, त्यामुळे ज्यांना माहीत आहे त्यांनी मला सांगावं की, मी कुठे ट्रिटमेंट केली पाहिजे? कशी ट्रिटमेंट केली पाहिजे मला आता काहीच कळत नाहीये, माझ्या वडिलांना मला वाचवायचंय काही करुन, मला मदत करा प्लीज…”.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्याला मातृशोक, आईचा निरोप घेताना अभिनेता आतून तुटला, म्हणाला, “आज जग…”

व्हिडीओ शेअर करत अरबाज शेखनं कॅप्शनमध्येही मदत करण्याचं आवाहन केलंय. अरबाज शेखनं म्हटलंय की, “आत्ता मी खूप आर्थिक अडचणीत आहे… पण तरीही माझ्या वडिलांचा treatment सुरू ठेवणं खूप गरजेचं आहे. Google pay no – 8888515473 तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, ज्यांना शक्य असेल त्यांनी थोडीशी आर्थिक मदत करावी किंवा हा post जास्तीत जास्त share करावा. तुमची छोटी मदत माझ्यासाठी खूप मोठी ठरेल…”. अरबाजच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी काळजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे.

Tags: Arbaz Shaikhmarathi actorsairat
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
Siddhivinayak Temple Controversy

"दोषी ठरलो तर मला त्याच मंदिरासमोर फासावर द्या", एकनाथ शिंदेंच्या आरोपांवर आदेश बांदेकर स्पष्टच बोलले, म्हणाले, "पुरावे नसताना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.