शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हल्ल्यानंतर पहिल्यांदाच घराबाहेर पडला सैफ अली खान, कामाला नव्याने सुरुवात, पण अजूनही जखमा कायम, फोटो व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 4, 2025 | 12:49 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Saif Ali Khan's neck wound photos

हल्ल्यानंतर सैफ अली खान कामावर रुजू, मानेवरील जखमांनी वेधलं लक्ष, फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर गेल्या महिन्यात घरात घुसलेल्या एका चोराने चाकूने हल्ला केला होता. या घटनेत अभिनेत्याला अनेक दुखापती झाल्या आणि त्याच्या पाठीच्या कण्यावर शस्त्रक्रियाही झाली. पाच दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर सैफ अली खान घरी परतला. या संपूर्ण घटनेनंतर, सैफ अली खान पुन्हा एकदा त्याच्या कामावर रुजू झाला आहे. हल्ल्यानंतर आता पहिल्यांदाचा सैफ अली खान एका कार्यक्रमात सहभागी झाला. यामुळे सध्या तो चर्चेत आला आहे. ‘ज्वेल थीफ – द रेड सन चॅप्टर’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका कार्यक्रमात तो पोहोचला होता. (Saif Ali Khan’s neck wound photos)

सैफ अली खानच्या ‘ज्वेल थीफ’ या चित्रपटाचा टीझर लाँच सोहळा नुकताच पार पडला. नेटफ्लिक्सने आयोजित केलेल्या या सोहळ्यासाठी अभिनेता असलेला सैफ अली खानही उपस्थित होता. त्याच्यासह चित्रपटातील इतर व्यक्तीही यावेळी हजर होते. या कार्यक्रमाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये त्याच्या मानेवरील जखमेवर टेप लावल्याचेही अनेक फोटो पहायला मिळत आहेत. त्याच्या कानाच्या खालून मानेपर्यंत पसरलेल्या मोठ्या जखमेचे फोटो व्हायरल होत आहेत.

For those that questioned Kareena and Saif these past few weeks; here are Saif’s latest pictures. Instead of flaunting his injuries, he makes an appearance with a collared shirt. A well healed laceration at the neck is visible. pic.twitter.com/znz2VghXm1

— Kareena Kapoor Khan FC (@KareenaK_FC) February 4, 2025

आणखी वाचा – “तेव्हा मी वर्षानुवर्षे टिकून राहिली”, कपिल शर्माबरोबरच्या कामाबद्दल सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “नाव, प्रसिद्धी आणि पैसा…”

यावेळी सैफ अली खानला तुला इथे आता उभं राहून कसं वाटतंय, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने उत्तर दिले. “मला इथे उभं राहून खरंच खूप चांगलं वाटत आहे. मला इथे येऊन खरंच खूप मस्त वाटत आहे. मी या चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहे. सिद्धार्थ आणि मी या चित्रपटावर खूप दिवसांपासून चर्चा करत आहे. हा चित्रपट एक खूपच सुंदर चित्रपट आहे आणि मी यासाठी प्रचंड उत्सुक आहे”, असे सैफ अली खान म्हणाला.

आणखी वाचा – Video : KBCमध्ये समय रैनाने अमिताभ बच्चन यांना थेट रेखा यांच्या नावावरुन डिवचलं, ‘तो’ व्हिडीओ तुफान व्हायरल

दरम्यान, सैफ अली खान बरा होऊन कामावर परतल्याने पुन्हा एकदा सोशल मीडियावर त्याच्यावरील चाकू हल्ल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. त्याच्या हल्ल्याला ‘प्रसिद्धीचा स्टंट’ म्हटल्या जाणाऱ्या आरोपांदरम्यान मानेवरील जखमेवर टेप लावल्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Tags: Saif Ali Khan InjuredSaif Ali Khan returned to work the attackSaif Ali Khan's neck wound photos
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Sanya Malhotra Dangal movie negative effect

'दंगल'नंतर सान्या मल्होत्राचं उद्धवस्त झालेलं आयुष्य, अभिनेत्रीचं मोठं भाष्य, म्हणाली, "अशी अवस्था होती की…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.