सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : KBCमध्ये समय रैनाने अमिताभ बच्चन यांना थेट रेखा यांच्या नावावरुन डिवचलं, ‘तो’ व्हिडीओ तुफान व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 4, 2025 | 12:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Samay Raina asked Amitabh about Rekha in Kaun Banega Crorepati show

कौन बनेगा करोडपती’मध्ये समय रैनाने अमिताभ बच्चन यांना रेखाबद्दल विचारला ‘हा’ प्रश्न, व्हिडीओ व्हायरल

‘कौन बनेगा करोडपती’ हा टीव्हीवरील लोकप्रिय प्रश्नोत्तरांचा शो आहे. या शोच्या प्रत्येक पर्वात अनेक लोक येतात, प्रश्नांची उत्तरं देतात आणि पैसे जिंकतात. या शोने अनेकांची स्वप्ने पूर्ण केली. या शोच्या नुकत्याच एका भागामध्ये यूट्यूबर्स, सोशल मीडिया सेन्सेशन्स आणि कंटेंट क्रिएटर्सनी हजेरी लावली. याचे काही प्रोमो समोर आले आहेत, ज्यात हे क्रिएटर्स अमिताभ बच्चन यांच्याशी गप्पा मारताना दिसले. ‘कौन बनेगा करोडपती’च्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या भागात कॉमेडियन समय रैना, तन्मय भट्ट, भुवन बाम आणि काम्या जानी पाहुणे म्हणून येणार आहेत. या शोचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. (Samay Raina asked Amitabh about Rekha)

यापैकी एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात समय रैना अमिताभ यांना रेखाबद्दल प्रश्न विचारत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये , समय रैना अमिताभ यांच्यासमोर बसलेला दिसत आहे. तो अमिताभ बच्चन यांना सर मी तुम्हाला एक विनोद सांगू का? असं विचारो. यावर अमिताभदेखील त्याला हो सांग ना असं म्हणतात. यानंतर, समय रैना त्यांना विचारतो की, “तुमच्यात आणि वर्तुळात काय साम्य आहे?”. यावर अमिताभ त्याला म्हणतात “काय आहे?”

View this post on Instagram

A post shared by Brainrot Indian???? (@brain.rot.indian)

आणखी वाचा – मुंबईच्या रस्त्यांवर फिरणारा आदीमानव आमीर खान नाही, अभिनेत्याच्या टीमकडून खुलासा, मग ती व्यक्ती कोण?

पुढे समय उत्तर देत म्हणतो की, “दोघांकडेही रेखा नाही”. समयचा हा जोक ऐकून अमिताभ बच्चन आणि बाकीचे प्रेक्षक हसायला लागतात. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काहींनी म्हटले आहे की, हा शोमधून हटवलेला सीन आहे. तर एकाने “हा व्हिडीओ खरा आहे का?” असा प्रश्न विचारला आहे. आता जर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना असे वाटत असेल की, शोमध्ये खरंच असं काही तरी घडलं आहे. पण हा व्हिडीओ बनावट असल्याचे म्हटलं जात आहे.

आणखी वाचा – “तेव्हा मी वर्षानुवर्षे टिकून राहिली”, कपिल शर्माबरोबरच्या कामाबद्दल सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “नाव, प्रसिद्धी आणि पैसा…”

अलीकडे एआय जनरेटेड असलेले व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. त्यापैकीच हा व्हिडीओ आहे. समय रैनाने शोमध्ये असा कोणताही प्रश्न विचारला नाही. हा व्हिडीओ एडिटिंग करुन तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या व्हिडीओची सत्यता जाणून अनेकांना धक्का बसला आहे.

Tags: Kaun Banega Crorepati show videoSamay Raina asked Amitabh about RekhaSamay Raina asked Amitabh about Rekha in Kaun Banega Crorepati show
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Saif Ali Khan's neck wound photos

हल्ल्यानंतर पहिल्यांदाच घराबाहेर पडला सैफ अली खान, कामाला नव्याने सुरुवात, पण अजूनही जखमा कायम, फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.