आमीर खानच्या ‘दंगल’ हा चित्रपट २०१६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. कुस्तीमध्ये प्रसिद्ध असलेल्या फोगट कुटुंबावर या चित्रपटाची कथा आधारित होती. ‘दंगल’ने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. केवळ भारतातच नाही तर परदेशातील प्रेक्षकांनाही या चित्रपटाने भुरळ घातली होती. आमिर खानच्या ‘दंगल’ने रेकॉर्ड ब्रेक २००० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. या चित्रपटातून अभिनेत्री सान्या मल्होत्राने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ‘दंगल’ चित्रपटाने सान्याला एका रात्रीत स्टार बनवलं. या चित्रपटात ती बबिता कुमारीच्या भूमिकेत होती. पण असं असलं तरी या चित्रपटाचा अभिनेत्रीवर नकारात्मक परिणाम झाला. याबद्दल स्वत: सान्याने भाष्य केलं आहे. (Sanya Malhotra Dangal movie negative effect)
शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये तिला दबंगबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी सान्याला ‘दंगल’चा तिच्यावर झालेला नकारात्मक परिणाम काय आहे असं विचारण्यात आलं. तेव्हा सान्या उत्तर देत असं म्हणाली की, “नकारात्मक परिणाम म्हणजे माझे केस वाढत नव्हते. मी सगळं केलं होतं. मी पोटावर झोपली आणि स्वतःला मालिश केले. माझी अवस्था अशी होती, माझे आयुष्य खूप उद्ध्वस्त झाले”. ‘दंगल’मध्ये सान्या एका पैलवानाच्या भूमिकेत होती. या कारणास्तव, तिला तिचे केस लहान ठेवावे लागले. या भूमिकेसाठी सान्याला खूप पसंती मिळाली. पण याचा तिच्या केसांवर चुकीचा परिणाम झाला.
आणखी वाचा – Video : KBCमध्ये समय रैनाने अमिताभ बच्चन यांना थेट रेखा यांच्या नावावरुन डिवचलं, ‘तो’ व्हिडीओ तुफान व्हायरल
मूळची दिल्लीची असलेल्या सान्या मल्होत्राने ‘डान्स इंडिया डान्स’मध्ये ऑडिशन देऊन करिअरची सुरुवात केली. डान्सची आवड असलेल्या सान्याला आपण चित्रपटांमधून नाव कमवू असं कधीच वाटलं नव्हतं. दिल्लीच्या गार्गी कॉलेजमधून तिने पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्याचवेळी ती कंटेम्पररी आणि बॅले नृत्य शिकली आणि नंतर ‘डान्स इंडिया डान्स’च्या ऑडिशनसाठी मुंबईत आली.
आणखी वाचा – हल्ल्यानंतर पहिल्यांदाच घराबाहेर पडला सैफ अली खान, कामाला नव्याने सुरुवात, पण अजूनही जखमा कायम, फोटो व्हायरल
दरम्यान, ‘दबंग गर्ल’ सान्या मल्होत्राने स्वतःच्या बळावर इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केलं आहे. सान्याने ‘दंगल’ ‘कटहल’, ‘सीक्रेट’, ‘पटाखा’, ‘बधाई हो’, ‘जवान’ यांसारख्या चित्रपटांमधून अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या भुमिका साकारण्यासाठी सान्या लोकप्रिय आहे. सध्या ती ‘मिसेस’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.